हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात प्राजक्ता माळी हि आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मालिका, सिरीज तसेच चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत प्राजक्ताने नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. एक अभिनेत्रीचं नव्हे तर प्राजक्ता एक उत्तम सूत्रसंचालिका देखील आहे हे तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ होस्ट करून दाखवलं. यासोबतच प्राजक्ताने ‘प्राजक्तराज’ नावाचा ज्वेलरी ब्रँड सुरु करून व्यावसायिका म्हणून एक नवी सुरुवात केली आहे. तिच्या ब्रँडचे दागिने अत्यंत सुंदर आणि लक्षवेधी असून मार्केटमध्ये त्यांना चांगली डिमांड आहे. नुकताच प्राजक्ताने एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ‘तन्मणी’ भेट केला आहे. याचा व्हिडीओ शेअर करत तिने सुंदर असे कॅप्शन शेअर केले आहे.
प्राजक्ताने काही महिन्यांपूर्वीचं ‘प्राजक्तराज’ हा दागिन्यांचा नवाकोरा ब्रॅंड लॉंच केला. यानंतर आता मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्रींनी ‘प्राजक्तराज’चे दागिने आवर्जून परिधान केले आहेत. प्राजक्ता माळीने नुकताचं तिच्या एका अत्यंत जवळच्या मैत्रिणीला ‘प्राजक्तराज’चा ‘तन्मणी’ भेट म्हणून दिला आहे. हि अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा असणारी अभिनेत्री अश्विनी कासार आहे. अश्विनी आणि प्राजक्ताची खूप चांगली मैत्री आहे.
प्राजक्ताने अश्विनीला तन्मणी देतानाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये अश्विनी म्हणतेय कि, ‘ही खरंच खूप गोड भेटवस्तू आहे. मला कधीतरी हा ‘तन्मणी’ मिळावा…अशी माझी मनापासून इच्छा होती’. यावर प्राजक्ता ‘मला तुझ्या मनातलं कळलं’ असं म्हणत अश्विनीला तो ‘तन्मणी’ भेट देते. अश्विनीने हा तन्मणी परिधान करत नवं फोटोशूट देखील केलं आहे. ज्याची एक झलक या व्हिडिओमध्य पहायला मिळते आहे. फ्लोरल प्रिंटेड साडी आणि त्यावर हा तन्मणी सेट परिधान केल्यानंतर अश्विनी कमालीची सुंदर दिसत आहे.