हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभारत पावसाने धुमाकूळ घातला असताना अनेक जण मान्सून ट्रिपचे नियोजन करत आहेत. आता पावसाळा म्हटलं कि, रस्त्यांची दूरवस्था, खड्डे, साचणारे पाणी हे सगळं आलंच. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या सर्व विषयांवर गहन चर्चा सुरु आहेत. दरम्यान गणपती जवळ येतायत त्यामुळे आता चाकरमान्यांची कोकणात ये जा वाढणार. अशात पावसाळ्यामुळे कोकणात जायचे रस्ते इतके खराब झाले आहेत कि हात, पाय, मान धडधाकट येणे अवघडचं! असाच कोकण प्रवासाचा एक व्हिडीओ शेअर करत मराठी अभिनेत्री गौरी किरणने रस्त्यावरील खड्डेच खड्डे दाखवले आहेत.
‘पुष्पक विमान’ फेम मराठी अभिनेत्री गौरी किरणने तिच्या अधिकृत असलं मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत म्हटले आहे की, ‘कोकण स्वर्गाइतकं सुंदर आहे, पण रस्ता खूप कठीण आहे…’. गौरीने पावसाळ्यादरम्यान मुंबई- गोवा हायवेची झालेली दूरवस्था या व्हिडीओतून दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. ‘कोकण हा खरंच स्वर्ग आहे, कारण स्वर्गात जायचा रस्ता जितका कठीण असतो तितकाच कोकणात जायचा रस्ता कठीण आहे’, असे तिने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
यांनतर तिने व्हिडिओत मुंबई- गोवा हायवे दाखवला आहे. त्यावरील मोठमोठे खड्डे अगदी स्पष्ट दिसत आहेत. साहजिकच या खड्ड्यांचा वाहन चालकांना त्रास होतोय. या खड्ड्यांमुळे प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी काही वेगळ्या सांगायला नको. अभिनेत्री गौरी किरण ही कोकणातील वेरळ गावची आहे. तिने हा व्हिडीओ मुंबईहून कोकणात जाताना खास मुंबई- गोवा हायवेवरील खड्डे दाखविण्यासाठी बनवला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकरी विविध कमेंट करत त्यांचाही संताप व्यक्त करत आहेत.