फिल्मसिटीत पुन्हा बिबट्या; मराठी मालिकेच्या सेटवर 200 लोकांचा जीव टांगणीला


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रपटनगरी म्हणजेच गोरेगाव फिल्मसिटीच्या आसपासचा संपुन परिसर हा जंगलाचा आहे. त्यामुळे अनेकदा विविध मालिका, चित्रपट, रिऍलिटी शोंच्या सेटवर वन्य प्राण्यांच्या शिरकावाचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. पण गेल्या १० दिवसात आता चौथ्यांदा फिल्मसिटीमध्ये मालिकांच्या सेटवर बिबट्या घुसल्याची बातची समोर आली आहे. नुकताच एका मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या त्याच्या बछड्यासह घुसला आणि यावेळी सेटवर उपस्ठित २०० लोकांचा जीव धोक्यात आला होता.

याविषयी अखेर आता अखिल भारतीय सिने वर्कर्स असोसिएशनने सरकारला दखल घेण्याबाबत प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे कि, ‘सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी. हा अनेकांच्या जीवाचा प्रश्न आहे’. अलीकडेच मंगळवारी एका बिबट्याने आपल्या बछड्यासह मुंबईतील फिल्मसिटीमध्ये प्रवेश केला आणि सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. एका मराठी टीव्ही मालिकेच्या शूटिंगदरम्यान बिबट्याला पाहताच क्षणी सेटवर हा गोंधळ उडाला. त्याला पाहून सगळेच घाबरले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे प्रमुख सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी या प्रकरणाबाबत म्हणाले, ‘सरकारने या घटनेची कृपया गांभीर्याने दखल घ्यावी. बिबट्याने सेटवर येण्याची गेल्या दहा दिवसांतील ही तिसरी किंवा चौथी वेळ आहे. असे क्रूर प्राणी सेटवर खुलेआम फिरत असतात तेव्हा सेटवर अनेक लोक असतात. त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. याहीवेळी सेटवर २०० हून अधिक लोक उपस्थित होते’. याआधी १८ जुलै २०२३ रोजी मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये मायरा वैकुळची हिंदी मालिका ‘नीरजा’च्या सेटवरदेखील बिबट्या फिरताना दिसला होता.