‘या’ दिवशी सुरु होणार मुक्ता- सागरच्या ‘प्रेमाची गोष्ट’; तेजश्रीच्या नव्या मालिकेचा प्रोमो व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री तेजश्री प्रधान हा मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकांमधून मध्यवर्ती भूमिका साकारत तेजश्रीने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली. मध्यंतरी तिने कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. पण आता लवकरच ती नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आगामी मालिकेचा नुकताच प्रोमो रिलीज झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तेजश्री प्रधानच्या आगामी मालिकेचे नाव ‘प्रेमाची गोष्ट’ असे आहे. शनिवारी या मालिकेचा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा हा पहिला प्रोमो असून कथानकाची एक छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. कथानकानुसार, मुक्ता (तेजश्री प्रधान) एका मध्यमवर्गीय कुटूंबातली मुलगी आहे आणि तिची आई तिच्या लग्नासाठी स्थळं शोधत आहे. मुक्ताला तिची आई पेपरमधील एक स्थळ दाखवते. यावर मुक्त आईला म्हणते, मुल जन्माला घालु न शकणारी मुलगी बायको म्हणुन चालेल का..? तर दुसरीकडे कोळी कुटुंबात सागरची (राज हंचनाले) आईदेखील त्याला मुलींचे फोटो दाखवत असते. पण तो आईला सांगतो, ‘माझी बायको कुणीही होईल.. पण सईची (सागरची मुलगी) आई होऊ शकणार नाही.

पुढे सई धावत तेजश्रीजवळ जाते आणि तिच्यासोबत खेळू लागते. असा हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेचा प्रोमो पाहताच प्रेक्षकांनी हि मालिका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे म्हटले आहे. तर होय. ही मालिका ‘ये हे मोहब्बते’ या हिंदी मालिकेचा रिमेक आहे. ज्यामध्ये करण पटेल, दिव्यांका त्रिपाठी मुख्य भूमिकेत होते. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत तेजश्री प्रधान, राज हंचनाले प्रमुख भुमिकेत तर शुभांगी गोखले, संजीवनी जाधव महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. येत्या ४ सप्टेंबर २०२३ पासून ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सायंकाळी ८ वाजता प्रसारित होणार आहे.