‘गरज आहे त्यांच्यासाठी..!! मयुरी देशमुख अजूनही सावरण्याच्या प्रयत्नात; म्हणाली, ‘मानसिक धक्क्यातून..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख ही ‘खुलता कळी खुलेना’ आणि ‘इमली’ यासारख्या मालिकांमधून प्रकाशझोतात आली. मयुरी देशमुख ही मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा आहे. सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते. याच माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. पतीच्या निधनानंतर मयुरी कोलमडून गेली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती पुन्हा एकदा आत्मविश्वासाने स्वबळावर उभी राहताना दिसतेय. अशातच तिची एक इंस्टा पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतेय.

मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख तिने अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये मयुरीने लिहिलंय की, ‘मानसिक धक्क्यातून सावरण्याची, संघर्षाला वाढीमध्ये आणि भीतीला प्रेमात बदलण्याची शक्ती माझ्या विश्वासामध्ये आहे’. तसेच या फोटोसोबत मयुरीने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘ज्या कुणाला हे वाचण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी….’. मयुरीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी विविध कमेंट द्वारे तिला धीर दिला आहे.

या पोस्टमध्ये मयुरी देशमुखने ‘विश्वासाची ताकद’ सांगितली आहे. ज्यावरून मयुरी पुन्हा एकदा भक्कमपणे उभी रहायचा प्रयत्न करत आहे हे समजते. तिच्या या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट करत म्हटले आहे कि, ‘तू कायम खुश रहा आणि अशीच मजबूत रहा’. आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘या विश्वासपूर्ण शब्दांसाठी तुझे खूप आभार.. मला गरज होती’.

मयुरीच्या आयुष्यात २ वर्षांपूर्वी अत्यंत मोठे वादळ आले होते. मयुरीचा पती आशुतोष भाकरेने आत्महत्या केली आणि यानंतर मयुरी पूर्ण हतबल झाली होती. पतीच्या निधनानंतर मयुरी अद्याप पूर्ण सावरू शकलेली नाही. पण यातून ती सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे बऱ्यादचा सोशल मीडियावर व्यक्त होताना ती हिंमत देणाऱ्या, आत्मविश्वासावर भाष्य करणाऱ्या आणि मनातील भावना व्यक्त करणाऱ्या पोस्ट शेअर करत असते.