‘डोळ्यात चमक अन चेहऱ्यावर..’; आयुष्यातील पहिलंच नाटक पाहिल्यानंतर रिंकू झाली निःशब्द


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री रिंकु राजगुरुला तिच्या मूळ नावाने कमी आणि आर्ची म्हणून जास्त ओळखले जाते. रिंकू राजगुरू सोशल मीडियावर कायम विविध लूक शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर करत आपण आयुष्यातील पहिले नाटक पाहिल्याचे सांगितले. रिंकूने ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक पाहिलं आणि त्याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना तिने हि पोस्ट शेअर केली आहे. यावेळी रिंकूने नाटकाचे तिकीट आणि त्यासोबत थिएटरमध्ये काही फोटो शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/Cvgp7WzNnou/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

या फोटोत रिंकूच्या डोळ्यातील चमक आणि चेहऱ्यावरील हावभाव तिच्या मनातील भावना व्यक्त करत आहेत. आयुष्यात पाहिलेल्या पहिल्या नाटकाचा अनुभव रिंकूने चाहत्यांसह शेअर केला आहे. तिने या फोटोंसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘माझ्या आयुष्यातील मी पाहिलेलं पहिलंच नाटक. अप्रतिम अनुभूती. सगळ्याच अंगाने सर्वांगसुंदर असं नाटक आहे ‘देवबाभळी’. प्राजक्त आणि सगळ्या टीमला खूप शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन!’. ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्राजक्त देशमुख यांनी केले आहे.

https://www.instagram.com/p/Crs-QaDNLJW/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

व्यावसायिक रंगभूमीवर ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने आजवर ४४ पुरस्कार पटकावले आहेत. या नाटकाला ‘साहित्य अकादमी’ युवा पुरस्कारदेखील मिळाला आहे. विशेष आणि अभिमानाची बाब म्हणजे हे नाटक मुंबई विद्यापीठाच्या बीए अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. यानंतर आता ‘संगीत देवबाभळी’ नाटकाचा हा विक्रमी प्रवास सांगतेकडे मार्गस्थ झाला असून शेवटचे काही प्रयोग उरले आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या ‘खिल्लार’ या आगामी चित्रपटात ती अभिनेता ललित प्रभाकरसोबत दिसणार आहे. या चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.