‘हिरवी झाडी, छोटे छोटे धबधबे, नयनरम्य पायवाट..’; प्राजक्ताने घेतला कुटुंबासोबत निसर्गाचा आनंद


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. केवळ अभिनेत्री नव्हे तर प्राजक्ता बिजनेस वुमनसुद्धा आहे. त्यामुळे सोशल मीडियासारख्या प्रभावी माध्यमाचा वापर करून ती कायम विविध फोटो, व्हिडीओ, आगामी प्रोजेक्ट्सची माहिती आणि अगदी तिच्या ‘प्राजक्तराज’ या ज्वेलरी ब्रॅण्डविषयी देखील ती अपडेट देताना दिसते. यामुळे ती सतत चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्रचंड व्यस्त शेड्युलमधून प्राजक्ताने फॅमिली टाइम काढत एक मस्त पिकनिक एन्जॉय केली आहे. ज्याचे व्हिडीओ आणि फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्राजक्ताने नुकताच तिच्या कुटुंबासोबत मान्सून ट्रिपचा आनंद घेतला आहे. प्राजक्ता तिच्या पूर्ण फॅमिलीसोबत कर्जतला एका फार्महाऊसवर गेली होती. चहुबाजूने डोंगर, हिरवी झाली आणि पावसामुळे तयार झालेले छोटे छोटे धबधबे अशा निसर्गरम्य वातावरणात प्राजक्ताने मान्सून ट्रिप एन्जॉय केली. तिने शेअर केलेल्या व्हिडिओत काही फोटो तर काही व्हिडीओ कोलाज केलेले दिसत आहेत. यामध्ये प्राजक्ता छोट्या धबधब्यात ओलीचिंब होऊन लहान मुलांसारखी एन्जॉय करताना दिसते आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलंय, निसर्ग तुम्हाला आनंदित करतो. पण कुटुंबासोबत निसर्गाचा आनंद ही बेस्ट थेरपी आहे.

याशिवाय प्राजक्ताची पूर्ण फॅमिली या फोटोंमध्ये दिसते आहे. ज्या फार्महाऊसमध्ये प्राजक्ता आणि तिचे कुटुंबीय थांबले होते त्याचेही फोटो यात दिसत आहेत. अत्यंत शांत आणि नयनरम्य अशा ठिकाणी हे फार्महाउस असल्यामुळे पिकनिकसाठी उत्तम जागा असल्याचे प्राजक्ताने सांगतेय. अलीकडेच प्राजक्ता माळीने कर्जतला स्वतःच फार्महाउस घेतल्याची चर्चा खुप रंगली आहे. कर्जतला निसर्गाच्या सानिध्यात प्राजक्ताने घेतलेल्या या नव्या घराला तिने ‘प्राजक्तकुंज’ असे नाव दिले आहे. यापुर्वी त्याचे फोटोदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फार्महाउस आता तिने इतर पर्यटकांसाठीही खुला केला आहे.