‘पाऊस आणि कवायत’; हलगी बीट्सवर जिगरी यार सल्या- लंगड्याचा ‘सैराट’ डान्स


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीसाठी फार महत्वाचा ठरला. या कलाकृतीने मराठी चित्रपटसृष्टीत चैतन्य आणलं. या चित्रपटाचे प्रेक्षक आजही चाहते आहेत. मराठी सिनेविश्वात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून ‘सैराट’ने स्वतःच्या नावावर एक विक्रम केला. एक नव्हे तर जवळपास तीन ते चार महिने या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं. आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला तर लोक आवर्जून पाहतात. या चित्रपटातील आर्ची आणि परश्या ही जोडी जितकी लोकप्रिय ठरली तितकेच सल्या आणि लंगड्यासुद्धा गाजले. परश्याचे हे मित्र आजही एकेमकांचे खास गडी आहेत.

सोशल मीडियावर अनेकदा सल्या आणि लंगड्या यांचे व्हिडीओ तसेच फोटो व्हायरल होत असतात. ‘सैराट’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेले हे दोघे खऱ्या आयुष्यातही चांगले घट्ट मित्र झाले आहेत. सल्या म्हणजे अरबाज शेख आणि लंगड्या म्हणजे तानाजी गलगुंडे अशी यांची मूळ नावे आहेत. तरीही लोक यांना मूळ नावापेक्षा सल्या आणि लंगड्या म्हणूनच ओळखतात. नुकताच सल्या आणि लंगड्याचा एक मस्त भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते रस्त्यावर भर पावसात नाचताना.. नाही नाही.. कवायत करताना.. नव्हे कवायत नाच करताना दिसत आहेत. हलगीच्या संगीतावर हे दोघे नाचताना दिसत आहेत.

दरम्यान, पावसाचा माहोलच असा असतो कि आपोआपच आपल्यात उत्साहाचा संचार होतो. भर पावसामध्ये फिरायला गेल्यानंतर दोस्तांमध्ये जी मजा मस्ती होते त्याची एक झलक सल्या आणि लंगड्याच्या या व्हिडिओत पहायला मिळतेय. दोघेही रस्त्यावर एकदम धमाल कवायत डान्स करताना दिसत आहे. आतापर्यंत तुम्ही सळसळणारी नागीन डान्स, कोंबडा डान्स, मोर डान्स आणि अजून बरेच डान्सचे विनोदी प्रकार पाहिले असतील. आता यामध्ये सल्या आणि लंगड्याचा कवायत डान्स देखील सामील झाला आहे. त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. शिवाय यावर अनेक नेटकरी एकापेक्षा एक कमेंट करत आहेत.