हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून अनेक मालिका निरोप घेत असल्याचे समोर आले आहे. यातील काही मालिका तर ऐन प्रसिद्धीच्या झोतात असताना निंरोपाकडे मार्गस्थ झाल्या आहेत. तर काही मालिका केवळ टीआरपी मिळत नसल्यामुळे मेकर्सला बंद कराव्या लागत आहेत. यांमध्ये आता कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचाही समावेश झाला आहे. मराठी मालिका विश्वातील हि एक लोकप्रिय मालिका आहे. जिच्या शेवटच्या भागांचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. अर्थात आता सुंदरा देखील प्रेक्षकांचा निरोप घेणार.
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही लोकप्रिय मालिका २०२० साली सुरु झाली आहे. मालिकेतील ट्विस्ट आणि कथानकातील ओघाने प्रेक्षकांना मालिकेशी जोडून ठेवले होते. मालिकेतील लतिका ही प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आहे. तसे या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचले आहे. पण लतिका आणि अभिमन्यू यांच्यावर प्रेक्षकांचे विशेष प्रेम होते. मध्यंतरी मालिकेत आलेल्या वळणात अभीचा मृत्यू दाखवण्यात आला. ज्यामुळे प्रेक्षक नाराज झाले होते. पण, त्यानंतर अभी आणि लतिकाच्या चिमुकल्या लेकीची एंट्री सुखावणारी ठरली.
यानंतर मालिकेत देवा हे नवे पात्र जोडले गेले. याही पात्रावर प्रेक्षकांनी प्रेम केले. आता अखेर या मालिकेचे कथानक सांगतेकडे वळले आहे. लवकरच लतिका आणि देवाचं लग्न दाखवण्यात येणार आहे आणि त्यानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेतील कलाकार लतिका म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईक आणि देवा म्हणजेच अभिनेता कुणाल धुमाळ यांनी ‘शेवटचा दिवस’ असं लिहीत सोशल मीडियावर मालिकेच्या सेटवरील शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.