साऊथच्या चित्रपटात मराठी कलाकारांची वर्णी; थलायवाच्या सिनेमात साकारल्या महत्वपूर्ण भूमिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला थलायवा रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा सिनेमा अखेर आता प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. रजनी अण्णाचा सिनेमा म्हटलं कि चाहत्यांची नेहमीच मौज असते.

थलायवाचा सिनेमा येणार म्हटलं कि आधीच ऍडव्हान्स बुकिंग सुरु होते. त्यामुळे नेहमीप्रमाणे रजनीकांत यांचा हा सिनेमा देखील तुफान हिट ठरतो आहे. दरम्यान विशेष बाब अशी कि या चित्रपटात २ मराठमोळे कलाकार देखील अत्यंत महत्वाच्या भूमिकेत दिसून आले आहेत.

https://www.instagram.com/reel/CvwyizTpVg2/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

वयाची सत्तरी पार केल्यानंतरही रजनीकांत ‘जेलर’ या सिनेमात अत्यंत प्रभावीपणे काम करताना दिसत आहेत. खतरनाक अॅक्शन, हटके डायलॉगबाजी आणि कातिलाना स्टाईलसोबत रजनीकांत बॉक्स ऑफिस गाजवत आहेत. तर ‘जेलर’मध्ये मराठीबाणा गाजवणाऱ्या अभिनेते मकरंद देशपांडे आणि अभिनेते गिरीज कुलकर्णी यांच्या भूमिकांचे विशेष कौतुक केले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून साऊथच्या चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांची वर्णी लागताना आपण पाहिली आहे. मराठी इतकेच दाक्षिणात्य कलाकारांमध्येही मराठी कलाकार आपल्या प्रभावी परफॉर्मन्सच्या जोरावर उठून दिसतात ही कौतुकाची बाब आहे.

‘जेलर’ या सिनेमात थलायवा रजनीकांत यांच्यासोबत अभिनेते मकरंद देशपांडे आणि अभिनेते गिरीश कुलकर्णी हे स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत. सिनेमात गिरीश कुलकर्णी यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे आणि त्यांनी थेट रजनीसोबत एंट्री घेत चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे.

तर अभिनेते मकरंद देशपांडे यांनी सिनेमात एका गुंडाची भूमिका साकारली आहे. ज्याला जेलमध्ये रजनीकांत धडा शिकवताना दिसत आहेत. पुढे जाऊन सिनेमात रजनीकांत यांच्या मदतीसाठी मकरंद यांची भूमिका महत्वाची ठरताना दिसते आहे. त्यामुळे या दोन्ही मराठी अभिनेत्यांच्या भूमिकांना सिनेमात एक वेगळं वजन आहे आणि यामुळे त्यांचे चाहते खुश आहेत.