जसराज- आनंदीचे सूर जुळले; गुपचूक कोर्टात उरकलं लग्न


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठा संगीत कलाविश्वात प्रख्यात गायिका आनंदी जोशी आणि गायक जसराज जोशी यांनी चाहत्यांना अत्यंत सुखद धक्का दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आनंदी आणि जसराज यांच्या नात्याबद्दल बोलले जात होते. अखेर जसराज आणि आनंदीने त्यांच्या नात्याला आता अधिकृत नाव दिले आहे. नुकतेच या दोघांनी कोर्टात गुपचूप पद्धतीने लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आनंदी आणि जसराजने लग्न करून त्यांच्या चाहत्यांना अगदी आनंदाचा मोठा धक्का दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आनंदी आणि जसराज रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. मात्र याबाबत त्यांनी कधीच अधिकृत विधान केले नाही. पण थेट लग्न करून मात्र त्यांनी आपल्या नात्याला नाव दिलं आहे. त्यांची लव्हस्टोरी कधी..? कुठे..? कशी..? सुरु झाली हे सांगणे जरी कठीण असले तरीही आता त्यांच्या सहप्रवासाला सुरुवात झाली आहे आणि या जोडप्याला नेटकरी शुभेच्छा तसेच शुभाशीर्वाद देत आहेत.

सोशल मीडियावर आनंदी आणि जसराज यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. ‘अत्यंत आदराने, आम्ही जीवनाच्या नवीन टप्प्यात पाऊल ठेवत असताना तुम्ही सर्वांनी आम्हाला आशिर्वाद द्यावा अशी नम्रपणे विनंती करतो’, अशी पोस्ट करत त्याची आपल्या लग्नाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. यामध्ये त्यांच्या हातात कोर्ट मॅरिज सर्टिफिकेट दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासुन जसराज आणि आनंदीचे रोमँटिक फोटो पहायला मिळत आहेत. ज्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली ण दोघे अचानक लग्न करतील, असा अंदाज कोणी बांधला नव्हता. दोघांनी अचानक लग्न केल्याने त्यांच्या फॅन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.