सेलिब्रिटी ना तू.. साडीवर मॅचिंग परकर मिळाला नाही..?; नेटकरी उडवतायत मानसी नाईकची खिल्ली


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणत आपला तालावर नाचायला लावणारी अभिनेत्री मानसी नाईक हि सोशल मीडियावर फार सक्रिय असते. यामुळे चित्रपट सृष्टीत फार सक्रिय नसूनही सोशल मीडियावर मात्र तिची कायम चर्चा असते. ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमीच विविध व्हिडीओ, लूक आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसते. इतकंच काय तर कधी लावणी, तर कधी मनमोहक अदांचा व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांना घायाळ करत असते. नुकताच तिने शेअर केलेला व्हिडिओदेखील व्हायरल होतो आहे. ज्यावर चाहत्यांकडून प्रेम आणि ट्रोलर्सकडून खिल्ली उडवली जातेय.

अभिनेत्री मानसी नाईकने नुकतीच सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केली आहे. ज्यामध्ये ती धावताना दिसते आहे. या व्हिडिओत तिने निळ्या रंगातील साडी परिधान केली आहे. तिचा या व्हिडिओत चेहरा दिसत नसला तरी तिची नाजूक कंबर पाहून भल्याभल्यांची बत्ती गुल्ल झाली आहे, मानसीने या व्हिडीओ पोस्ट सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘कुछ तो चाहत होंगी, इस बारिश की बूंदो की, वरना कौन गिरता है जमीन, आकाश तक पहुंचने के बाद … लवकरच येत आहे.. धन्यवाद युनिव्हर्स.. मी हार मानणार नाही.. ग्लोइंग ग्लोइंग आणि हीलिंग’. मानसीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. तर ट्रोलर्सने नेहेमीप्रमाणे स्वतःचे काम चोख पार पाडले आहे.

या व्हिडिओवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘मस्त, पण मानसी तुझा चेहेरा बघितल्या शिवाय मन नई भरत बरका.. एकदा पलटायला पाहिजे होतं राव…..’. तसेच आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘कोणी इतक परफेक्ट कस काय असू शकत..?’ अशाप्रकारे अनेक चाहत्यांनी या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करताना हार्ट ईमोजी, फायर इमोजी शेअर केले आहेत. तर एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘काय बाई साडीवर परकर तर मॅच घालायचा’. आणखी एकाने लिहिले, ‘पाण्याची टाकी भरली…त्यामुळे बटन बंद करायला पळत चालल्यात वाटतय’. माहितीनुसार, मानसीचा लवकरच इंस्टाग्राम इन्फ्लूएंसर तन्मय पाटेकरसोबत नव्या गाण्यात दिसणार आहे. या गाण्याची दोघांचेही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.