‘आनंदाच्या व्याख्या खूप वेगवेगळ्या…’; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याची पोस्ट व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’चा टीआरपी नेहमीच हाय रेंजवर असतो. मालिकेचे कथानक, त्यातील ट्विस्ट, कलाकार आणि त्यांचा अभिनय प्रेक्षकांना मालिका पाहण्यासाठी भाग पाडत असतं. याच मालिकेत ‘अनिरुद्ध’ हे नकारात्मक पात्र साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. विविध पोस्टच्या माध्यमातून ते कायम आपले अनुभव, किस्से आणि प्रेरणादायी संदेश शेअर करताना दिसतात. आताही त्यांची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतात.

मिलिंद गवळी यांनी आपले ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत लिहिले आहे कि, ”’आनंद” प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या खूप वेगवेगळ्या असतात, काही ना खाण्यापिण्यामध्ये खूप आनंद मिळतो. माझा एक मित्र आहे, खास एखाद्या हॉटेलमध्ये एखादी डिश अतिशय चांगली मिळते म्हणून खूप लांबचा प्रवास करून तिथे जाऊन तो पदार्थ खातो, काही जण असे असतात की खाण्यापेक्षा त्यांच्या खाण्यावरच्या चर्चा करायला खूप आवडतं, काहींना तर झोपण्यामध्ये आनंद मिळतो, अगदी अभिमानाने सांगतात की “आज साडेबारा- एक वाजता उठलो आणि मग नाश्ता केला”, काहीना मोबाईल गेम्स खेळण्यात, वाचन लिखाण सिनेमा पाहायला, काही ना प्रवास करण्यामध्ये आनंद मिळतो, काही जणांना गाण्यांमध्ये आनंद मिळतो. काहीं ना निसर्गाच्या सानिध्यात आनंद, माझं असं लक्षात आलं आहे की आनंद हा आपल्याच मानण्यामध्ये असतो, माझ्या आयुष्याच्या प्रवासामध्ये मला काही छान आनंदी माणसं भेटली होती, जी काही कारण नसलं तरी आनंदी असायची, सदैव प्रसन्न असायची, दोन पैसे कमी असतील त्यांच्याकडे पण कधीही त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कमी व्हायचं नाही, त्यांना भेटलं की आपोआपच आपल्याही चेहऱ्यावर एक स्मितहास्य यायचं, माझ्या वडिलांना दुसऱ्यांना मदत करान्यात फार आनंद मिळतो, दुसऱ्याला आपली गरज आहे आणि त्यांना मदत करण्यात आनंद मिळतो आणि ते प्रसन्न होतात’.

‘ते पोलीस खात्यात होते त्यावेळेला त्यांचा गैरफायदा घेणारे असंख्य लोक होते, आम्हाला ते जाणवायचं की हा माणूस त्यांचा गैरफायदा घेतो आहे, पण त्याचं त्यांना कधीच काही वाटलं नाही, आपल्याकडे मदत मागायला आलाय आणि आपण त्याला प्रामाणिकपणे मदत करावी एवढेच त्यांना माहीत होतं. त्यामुळे ते सतत प्रसन्न आणि आनंदी राहतात , कारण मनामध्ये काही कपटच नसतं . प्रामाणिकपणे काम करत राहणे यात जो आनंद आहे तो आनंद कशातच नाही असं त्यांना वाटतं, मी कसा जरी असलो तरी माझ्या आई-वडिलांचे काही अतिशय चांगले गुण माझ्यामध्ये थोडीफार उतरलेले आहेत, कदाचित त्यामुळेच इतकी वर्ष मी या क्षेत्रामध्ये मी तरलोय . आनंदी प्रसन्न माणसं सगळ्यांनाच आवडतात असतात, पण रागावणार्या माणसां पासून लोक थांब पळत असतात, रागावणं चिडणं किंवा शिवीगाळ करणं याने मला असं वाटतं त्याने आपल्या च शरीरामध्ये बिघाड होतो, त्यांचं स्वतःचं शरीराचे इंजिन तापल्यामुळे लवकर बंद पडायची शक्यता असते, याउलट आनंदी माणूस खूप निरोगी आणि energetic आयुष्य जगतो. मला फोटो काढायला आणि काढून घ्येण्यात आनंद मिळतो’.