‘कळत नाहीये काय चाललंय..’; MHJ’च्या सेटवरून प्रसाद ओकने शेअर केला कॉमिक व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा घराघरांत सर्वाधिक पाहिला जाणारा कॉमिक शो आहे. या शोच्या माध्यमातून अनेक कलाकार मंडळी प्रकाशझोतात आले आहेत. मध्यंतरी ब्रेक घेतलेल्या या कार्यक्रमाने आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आग्रहास्तव नवी सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला १४ ऑगस्ट २०२३ पासून सुरुवात झाली आहे. हास्यजत्रेच्या सेटवर सगळे कलाकार आणि परिक्षक मंडळी कायम मजामस्ती करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ प्रसाद ओकने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकर परीक्षकांची भूमिका सांभाळताना दिसतात. प्रसाद ओकने नुकताच हास्यजत्रेच्या शूटिंग सेटवरील एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. प्रसादसोबत त्याच्या शेजारी सई ताम्हणकरदेखील या व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला प्रसाद ओक म्हणतो कि, ‘नमस्कार!! मी हास्यजत्रेच्या सेटवरुन तुम्हा सगळ्यांशी बोलत आहे आणि इथे हास्यजत्रेच्या सेटवर माझ्या शेजारी नक्की काय चाललंय हे मला कळत नाहीये… तुम्हाला कळालं तर तुम्ही मला समजावून सांगा’.

असे सांगून प्रसाद कॅमेरा सईकडे फिरवतो. मग सई म्हणते कि, ‘आमचे महाबळेश्वर काका आहेत त्यांच्याकडून मी शुभेच्छा घेत होते’. असं बोलताना सई तिच्या हातातील एक फोटो दाखवते. हा फोटो जत्रेकऱ्यांचा लाडका दादूस म्हणजेच अरुण कदम यांचा फोटो दाखवते. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट केल्या आहेत. एकाने तर ‘अरुण कदम महाबळेश्वरचे आहेत का…?’ असेही विचारले आहे.