‘जाऊ नको दूर.. बाबा’ मालिकेत सुयश टिळकची एंट्री; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला,


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुयश टिळक हा मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा आहे. त्याने विविध मालिका, नाटकं, चित्रपटांमधून वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. आपल्या प्रत्येक भूमिकेतून तो प्रेक्षकांवर छाप टाकताना दिसतो. त्यामुळे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्टबाबत कायम उत्सुक असतात. आतापर्यंत सुयशने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. पण ‘झी मराठी’वरील ‘का रे दुरावा’ मालिकेतून तो घराघरात पोहोचला. त्याने साकारलेला जयराम प्रेक्षकांना भावला. यानंतर आता पुन्हा एकदा सुयश एकदा नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

मध्यंतरी झी मराठी वाहिनीवरील नुकतीच बंद झालेली मालिका ‘लोकमान्य’मध्ये अभिनेता सुयश टिळकने अत्यंत महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेत त्याने वासुदेव बळवंत फडके ही महत्त्वाची भूमिका साकारली होती. शिवाय ‘सोनी मराठी’ वाहिनीवर ‘जीवाची होतिया काहिली’ या मालिकेतदेखील त्याने अत्यंत वेगळी मात्र लक्षवेधी भूमिका साकारली होती. यानंतर आता ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘जाऊ नको दूर … बाबा’ या मालिकेतून सुयश डॉ. नचिकेतच्या भूमिकेत झळकतोय.

याबाबत सुयश टिळकने स्वतःहून सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये सुयशने मालिकेतील भूमिकेचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टवर सुयशने चाहते त्याला नव्या मालिकेसाठी आणि नव्या भूमिकेसाठी भरभरून शुभेच्छा देत आहेत. काहींनी या पोस्टवर कमेंट करत आपल्याला सुयशने काम आवडत असल्याचेही म्हटले आहे.