हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कॉमिक शोमधून विनोदवीर दादूस म्हणजेच अरुण कदम हे कायम प्रेक्षकांना त्यांच्या विनोदी शैलीने खळखळून हसवतात. अशा या विनोद वीराच्या आयुष्यात अत्यंत भावस्पर्शी घटना घडली आहे. अरुण कदम आजोबा झाले आहेत. त्यांची लेक सुकन्याने गोंडस राजकुमाराला जन्म दिला आहे. आता सुकन्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून हि गोड बातमी शेअर करताना दादूस आणि नातवाचा अत्यंत सुंदर फोटो शेअर केला आहे.
आपल्या विनोदाने सर्व प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारे अरुण कदम आता आजोबा झाल्याचा आनंद साजरा करत आहेत. त्यांची लेक सुकन्याने शनिवारी १९ ऑगस्ट २०२३ रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तिला पुत्रप्राप्ती झाली आहे. यानंतर आता अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिने बाळासोबतचे प्रत्येकाचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने आजोबा अरुण कदम यांचा आणि बाळाचा फोटो देखील शेअर केला आहे. ‘मुलगा झाला’ असं कॅप्शन देत तिने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सुकन्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे आई- वडील म्हणजेच अरुण कदम आणि वैशाली कदम दिसत आहेत. तसेच सुकन्याचा पती सागर पोवळेचादेखील बाळासोबतचा फोटो आहे. सुकन्या आणि सागर यांनी आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. आता दोघेही पालक म्हणून एका नव्या जबाबदारीने आपल्या पहिल्या बाळाचे संगोपन करणार आहेत. सुकन्याने फोटो शेअर करताना बाळाच्या चेहऱ्यावर हार्ट इमोजी पोस्ट करत फोटो शेअर केले आहेत.
अरुण कदम यांची लेक सुकन्या आणि सागर यांचे २०२१ मध्ये लग्न झाले. ती एक कमर्शिअल आर्टिस्ट आणि ग्राफिक डिझायनर आहे. सोशल मीडियावर बऱ्याचवेळा ती वडील अरुण कदम यांच्यासोबत रिल्स शेअर करताना दिसते.