‘मैं तेरी दुश्मन.. दुश्मन तू मेरा..’; मानसी नाईकचा नागीन डान्स पाहिलात का..?


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने, अभिनयाने आणि ठसकेबाज अदाकारीने कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मानसी नाईक हि कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. चित्रपट, मालिका, अल्बम सॉंग अशा विविध माध्यमातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करते. सोशल मीडियावर तिचे बरेच रिल्स व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर सक्रिय असणारी मानसी नाईक आता पुन्हा एकदा एका रिलमुळे चर्चेत आली आहे. मानसीचा नागीन डान्स सध्या तुफान व्हायरल होतो आहे.

अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. सोमवारी श्रावण महिन्यातील पहिला सण ‘नागपंचमी’ साजरा करण्यात आला. ‘नागपंचमी’च्या निमित्ताने मानसीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये ती नागिन डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओत मानसीने काळ्या रंगाची साडी परिधान केल्याचे दिसत आहे. शिवाय तिचा पूर्ण लूक लावणीचा आहे. या व्हिडिओत मानसीने बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या प्रसिद्ध चित्रपट ‘नगिना’ मधील ‘मैं तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा’ या गाण्यावर नागीन डान्स केला आहे.

https://www.instagram.com/p/Cv_dRqRqRoM/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

या व्हिडिओसोबत मानसीने कॅप्शनमध्ये सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हा व्हिडिओ तिने २०२२ साली ३१ तारखेला तिच्या बॉईस टीमसोबत शूट केला असल्याचं तिने सांगितले. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकरी विविध कमेंट करत आहेत. कुणी तिच्या नृत्यशैलीचे कौतुक करत आहे. तर कुणी तिच्या नागीन डान्सवरून तिची खिल्ली उडवत आहेत. पण तरीही सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी ही नागीण आणि तिचा डान्स आवडल्याचे दिसत आहे.