कृपया असे करू नका!! ‘सुभेदार’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद.. मात्र ‘या’ कारणामुळे दिग्दर्शक नाराज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच शुक्रवारी २५ ऑगस्ट २०२३ रोजी दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ प्रदर्शित झाला. हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच चर्चेत होता. यामध्ये नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची शूर गाथा पहायला मिळतेय. ‘सुभेदार’ प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षकांमध्ये त्याबाबत मोठी उत्सुकता पहायला मिळाली. यानंतर आता जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे तेव्हापासून प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद अन प्रेम मिळवतो आहे. असे असूनही चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर मात्र प्रेक्षकांवर नाराज झाले आहेत.

त्याच झालं असं कि, २५ ऑगस्टला जेव्हा ‘सुभेदार’ रिलीज झाला, तेव्हापासून अनेक प्रेक्षक चित्रपटगृहात चित्रपट सुरु असतानाचे काही भाग आणि मुख्य करून क्लायमॅक्सचे भाग मोबाईलवर शूट करत आहेत. नुसते शूट करत नाहीत तर हे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत आणि यामुळे चित्रपट न पाहिलेल्या इतर प्रेक्षकांचा मात्र चित्रपटातून इंटरेस्ट निघून जातो आहे. याविषयी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लांंजेकर यांनी सुभेदार रिलीज झाल्यावर काही तासानंतर एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला.

हा व्हिडीओ शेअर करताना चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले कि, ‘काही प्रेक्षक सुभेदार सिनेमा पाहून सिनेमाच्या क्लायमॅक्सचा काही भाग मोबाईलवर शूट करुन अपलोड करत आहेत. मी तुमच्या भावनांचा आदर करतो. पण कृपया असं करु नका. ज्यामुळे सिनेमा पाहणाऱ्या इतर प्रेक्षकांचा रसभंग होईल. त्यामुळे सिनेमाचा क्लायमॅक्स किंवा इतर कोणताही भाग शूट करु नये’. अशा प्रकारे दिग्पाल लांजेकर चित्रपटगृहात चित्रपट पहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना विनंती केली आहे.