व्हॉट झुमका… भाऊ कदम यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीला दिलं खास गिफ्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कॉमिक शोमधून कायम प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणारे अभिनेते भालचंद्र कदम अर्थात सर्वांचे लाडके भाऊ सोशल मीडियावर फार सक्रिय नसतात. तरीदेखील त्यांची हवा मात्र सोशल मीडियावर कायम असते. नुकताच भाऊ आणि त्यांची पत्नी ममता कदम यांनी लग्नाचा वाढदिवस आपल्या कुटुंबासोबत साजरा केला. यानिमित्त भाऊंनी पत्नी ममताला एक खास गिफ्ट दिलं आहे. पाहुयात हे गिफ्ट काय आहे.

अभिनेते भाऊ कदम यांची लेक मृण्यमी कदमने तिच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भाऊ कदम आणि ममता कदम यांच्या तीन मुली आणि एक मुलगा आपल्या आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना दिसत आहे. घरातल्या घरात पण अत्यंत आनंदाने हे छोटंसं सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी त्यांनी घरच्या घरी केक कापत आनंद साजरा केला. यानंतर भाऊ कदम यांनी पत्नी ममताला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक भेटवस्तू दिली. भाऊ कदम यांनी आपल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून अत्यंत सुंदर असे झुमके भेट दिले आहेत.

या झुमक्याची डिझाईन फारच नाजूक आणि तितकीच सुंदर असून त्यावर डायमंड पहायला मिळत आहे. भाऊंच्या पत्नीने हे गिफ्ट उघडत सर्वांना आपले झुमके दाखवले आहेत. तर यावेळी भाऊ कदम यांच्या पत्नीनेही त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सोन्याचे ब्रेसलेट भेट म्हणून दिले आहे. हे ब्रेसलेट ममता यांनी स्वतःच पती भालचंद्र यांच्या हातात घातलं. त्याचीही झलक या व्हिडीओत दिसत आहे. भाऊ कदम यांच्या घरातील हे छोटं सेलिब्रेशन व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांनाही त्यांच्या आनंदात सामावून घेत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.