वीणा जगतापचे सिनेविश्वात पदार्पण; ‘या’ चित्रपटातून झळकणार मोठ्या पडद्यावर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा अभिनेत्री वीणा जगताप हि या ना त्या कारणाने सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. बिग बॉस मराठी सीजन २ मधून वीणा सर्वाधिक प्रकाशझोतात आली आहे. त्याआधी तिने विविध मालिकांमध्ये लहान मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे वीणाचं फॅन फॉलोईंग देखील चांगलं आहे. मालिका विश्वात दमदार कामगिरी केल्यानंतर आता वीणा मोठा पडदा गाजवण्यास सज्ज झाली आहे.

https://www.instagram.com/reel/CvuUwEiOF_D/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

बिग बॉस मराठीची विविध पर्व गाजवलेले अनेक कलाकार एकाच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ‘दिल दोस्ती दिवानगी’ असे शीर्षक असलेल्या मराठी चित्रपटातून हे कलाकार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. ज्यामध्ये वीणा जगतापचा देखील समावेश आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते विद्याधर जोशी, अभिनेत्री सुरेखा कुडची, वीणा जगताप आणि स्मिता गोंदकर हि मंडळी या चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. हा चित्रपट येत्या ६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटात मैत्री, प्रेम आणि त्यानंतरच्या आयुष्यात अडकलेल्या प्रेमवीरांची कथा आपल्याला पहायला मिळणार आहे. या प्रेमकथेच्या प्रवासात घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी आणि त्यांचा रंजक अनुभव देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना गुंतवून ठेवेल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केलाय. या चित्रपटात विद्याधर जोशी मायकेल ब्रिगेन्झा, सुरेखा कुडची मिस मेरी या कॅथलिक व्यक्तिरेखा साकारत आहेत. तर स्मिता गोंदकर रिया आणि वीणा जगताप श्रिया ही ग्लॅमरस पात्र साकारणार आहेत. या चौघांसोबत कश्यप परुळेकर, चिराग पाटील, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग, प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, स्मिता जयकर हे कलाकारदेखील या चित्रपटात दिसणार आहेत.