पुढील 2 वर्षांनी प्राजक्ता माळी होणार अस्सल पुणेकर; लग्नाचा विचार करतेय का आणि काही..? जाणून घ्या


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक प्राजक्ता माळी ही सर्वांची लाडकी आहे. तिचं निखळ सौंदर्य, मनाला मोहणारं हास्य आणि तिला सालस अंदाज नेहमीच प्रत्येकाच्या मनावर जादू करतो. आजवर प्राजक्ताने विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मालिका, चित्रपट, वेब सिरीज यांशिवाय सूत्र संचालिका म्हणून देखील तिने कार्यक्रम गाजवले आहेत. अतिशय कष्ट करत विविध माध्यमात काम करून प्राजक्ताने तिच्या आयुष्यातील एक स्वप्न पूर्ण केलं आहे. हे स्वप्न म्हणजेच स्वतःच हक्काचं घर.

एका नामांकित वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने पुण्यामध्ये हक्काचं असं स्वतःच नवीन घर घेतलं आहे. याबाबत स्वतः प्राजक्ता माळीने एका यु ट्यूब शोमध्ये खुलासा केला आहेय. पुण्यात घर घेतल्यामुळे आता प्राजक्ता पुणेकर झाली आहे. एका टॉवरमध्ये तिने १७ व्या मजल्यावर घर बुक केल्याचे म्हटले जात आहे. प्राजक्ताने रजिस्ट्रेशन आणि इतर कागदपत्रांची पूर्तता केली असून तिची स्वप्नपूर्ती झाली आहे. प्राजक्ताला नवीन टॉवरचे जिथे बांधकाम सुरु आहे त्याचे कन्स्ट्रक्शन आणि इमारतीचा प्रशस्त असा आवार खुप आवडला आहे. त्यामुळे नवीन घराविषयी प्राजक्ता अत्यंत उत्सुक आणि खूप आनंदी आहे.

माहितीनुसार, प्राजक्ता माळीने नवीन घरासाठी एक सुंदर आणि मनोवेधक अशी नावाची पाटीसुद्धा बनवून घेतली आहे. काहीच दिवसांपूर्वी प्राजक्ताने या नावाच्या पाटीची एक झलक शेअर केली होती. सध्या प्राजक्ताने नवीन घरासाठी लागणाऱ्या सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या आहेत आणि या घराचा ताबा तिला पुढील २ वर्षांनी मिळणार आहे. प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या ती सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमिक शोचे बहारदार सूत्रसंचालन करत आहे. सध्या या शोमधील कलाकार मंडळी काही महिन्यांच्या विश्रांतीवर आहेत. त्यामुळे प्रेक्षक या शो ला मिस करत आहेत.