हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला ‘ख्वाडा’, ‘बबन’ आणि ‘टीडीएम’सारख्या दर्जेदार कलाकृती देणारे मराठमोळे प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांची स्व बळावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अनेक मातीतील कलाकारांना त्यांनी चित्रपटातून संधी देत प्रकाशझोतात आणले आहे. त्यामुळे भाऊराव कऱ्हाडे यांचा मोठा चाहता वर्ग आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावर देखील त्यांचे खूप फॉलोवर्स आहेत. अशातच भाऊराव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न ठरल्याची माहिती दिली आहे.
दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ते त्यांच्या होणाऱ्या पत्नीसोबत दिसत आहेत. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आता लवकरच खरा सिनेमा सुरू…. तुम्ही सगळ्यांनी आशिर्वाद द्यायला नक्की यायचंय…” अशाप्रकारे भाऊराव यांनी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून हि आनंदाची बातमी शेयर केली आहे. आता भाऊराव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
भाऊराव यांनी होणाऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेयर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. त्यांचा हा फोटो आणि पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यांचे चाहते त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे. भाऊराव यांनी आजतागायत विविध ढंगाचे आणि धाटणीचे अत्यंत आशयघन चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. ज्यामुळे ते कायम चर्चेत राहिले आहेत. यानंतर आता ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. भाऊराव यांना आयुष्याची नवीन सुरुवात करताना नेटकऱ्यांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत.