‘खरंच नावाप्रमाणे सगळा रॉयल कारभार…’; हेमांगीने फोटो शेअर करत व्यक्त केला इच्छापुर्तीचा आनंद


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री हेमांगी कवी कायम विविध कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सामाजिक, राजकीय तसेच अव्यक्त विषयांवर स्पष्ट बोलण्यासाठी हेमांगी ओळखली जाते. दरम्यान अलीकडेच हेमांगीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत चाहत्यांना तिच्या स्वप्नाबद्दल सांगितले होते. मुंबईतील चर्नी रोड मधील रॉयल ऑपेरा हाऊस मध्ये हेमांगीच्या जन्मवारी नाटकाचा प्रयोग नुकताच पार पडला. या निमित्ताने हेमांगीचे रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये प्रयोग सादर करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. या अनुभवाबद्दल तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

हेमांगीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो रॉयल ओपेरा हाऊसच्या बाहेरचे आहेत. हेमांगीने या फोटोंसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘खरंतर भक्ताला कुठलंही देऊळ सारखंच! इतर अनेक ठिकाणी त्याने विठ्ठलाची मूर्ती पाहीलेली असली तरीही ‘’आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला जाऊन दर्शन घ्यावं’’ ही इच्छा तो मनी बाळगतोच! तसंच माझंही होतं. मला कुठल्याही नाट्यगृहात प्रयोग करायला आवडतंच पण ‘’साला एकदा तरी या रॅायल ॲापेरामध्ये प्रयोग करायचाय यार’’ ही अनेक वर्षांपासूनची इच्छा होती! आणि… काल मुंबईच्या रॅायल ॲापेरा हाऊस मध्ये आमच्या ‘’जन्मवारी’’ नाटकाचा रॅायल प्रयोग झाल्यामुळे माझी ही पण इच्छा पूर्ण झाली! खरंच नावाप्रमाणे सगळा रॅायल कारभार. नाट्यगृहाचं interior, lights, decorum, greenrooms, त्यातलं furniture, स्वच्छता, corridors, रंगसंगती, sound system, भव्य दिव्यपणा! आहाहा! क्या बात है. सगळंच विलक्षण! एखाद्या राजमहालात आलोय की काय असंच वाटत होतं!’

पुढे लिहिलंय, ‘इतक्या वर्षांपासून फक्त इतरांकडून या वास्तूचं कौतुक ऐकत आलेय, कुणाकुणाच्या photos मध्ये पाहत आलेय पण काल मी चक्कं त्या वास्तूमध्ये उभं राहून प्रयोग सादर केला! अनेक वेळा मी या नाट्यगृहाला बाहेरून बघितलंय पण कायमच ‘आतून हे कसं असेल’ याचं कुतूहल वाटत आलंय. म्हणजे रीतसर तिकीट काढून प्रेक्षक म्हणून नाट्यगृह नक्कीच बघता आलं असतं पण आपन ठहरे कलाकार!!! “आत पाऊल ठेवेन ते माझ्या नाटकाचा प्रयोग करायलाच”!!! या खुळ्या निग्रहामुळे खूप वर्ष वाट पाहावी लागली खरंतर मला पण ते वाट पाहणं worth होतं असंच वाटलं! अनेक दिवस वारीत चालून झाल्यावर जेव्हा पंढरपूरात पाऊल पडतं तेव्हा जे त्या भक्ताचं होत असेल तेच माझं ही झालं! धन्य धन्य! माझा हा निग्रह पुर्ण करण्याची आणि प्रयोग सादर करण्याची संधी मिळाली ते ‘नाट्यधारा’ नाट्यमहोत्सवामुळे. संपूर्ण भारतातून काही नाटकांची निवड केली होती त्यात ‘जन्मवारी’ नाटक निवडल्याबद्दल नाट्यधारा निवडसमीतीचे आणि अनेक वर्षांपासून रंगभूमीची ज्या मनापासून जोपासना करताएत असे आमचे Ravi Mishra sir यांचे खूप खूप धन्यवाद!’