नैतिकतेच्या आईचा घो!! महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर MHJ’च्या दिग्दर्शकाची खरमरीत पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सर्वत्र महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींची चर्चा रंगली आहे. राजकीय वर्तुळात होणारे सत्ताबदल गेल्या काही काळात इतके विचित्र पद्धतीने झाले आहेत कि नेमकं क्या घडतंय ते समजण्याआधीच सगळं संपलेलं असतं. नुकताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत बंड पुकारत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि सगळेच थक्क झाले. यावेळी अजित पवारांसोबत इतर आमदारांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली. या परिस्थितीवर राजकीय क्षेत्रातील मंडळींसह अनेक कलाकार मंडळी व्यक्त होत आहेत. ज्यामध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचे लेखक सचिन गोस्वामी यांचाही समावेश आहे.

सचिन गोस्वामींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत खरमरीत टीका केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय की, ‘महाराष्ट्रात सर्व पक्षीय राजवट.. भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपातील काँग्रेसी नेते एकत्र येऊन महाराष्ट्र घडवणार… (मतदारांची ऐशी तैशी..नैतिकतेच्या आईचा घो….)’. सचिन गोस्वामींची हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी सचिन गोस्वामींच्या या पोस्टसोबत आपली सहमती दर्शवली आहे.

दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंड पुकारत आपल्या ३५ आमदारांसह शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. या सरकारमध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून इतर ८ आमदारांनी अन्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्माराव अत्राम, धनजंय मुंडे, आदिती तडकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या ८ आमदारांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आता शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार आले आहे.