प्राजूच्या फार्महाऊसवर जत्रेकऱ्यांची धमाल- मस्ती- कल्ला; वनिताने शेअर केला व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमिक कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळी अत्यंत भूमिका साकारते आहे. या कार्यक्रमातून आपल्या निवेदन कौशल्य दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या प्राजक्ताचे महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारासोबत एक नाते तयार झाले आहे. दरम्यान नुकताच प्राजक्ताने तिचा वाढदिवस या कलाकार मंडळींसोबत साजरा केला. यानिमित्त हास्यजत्रेतील सर्व कलाकार मंडळी प्राजक्ताच्या कर्जत येथील ‘प्राजक्तकुंज’ फार्महाऊसवर गेले होते. याचा खास व्हिडीओ वनिता खरातने तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.

अगदी काही दिवसांपूर्वीच प्राजक्ता माळीने हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमबरोबरचे आपल्या फार्महाऊसवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर आता वनिताने तिच्या युट्युब चॅनेलवर प्राजूच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना वनिताने लिहिले आहे कि, ‘प्राजक्ताने फार्महाऊस घेतलं आणि आम्ही तिथे पार्टी करायला गेलो नाही ऐसा हो नहीं सकता! प्राजक्ता माळीच्या फार्म हाऊसवर आम्ही खूप धमाल मस्ती केली’.

या व्हिडिओत प्राजक्ताच्या फार्महाऊसची झलक पहायला मिळते. सोबतच निसर्गरम्य वातावरण, प्रशस्त आवार, स्विमिंग पूलदेखील दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कलाकारांनी केलेली मजा आपण छोट्याशा झलक स्वरूपात पाहू शकतो. यामध्ये वनिता खरात, समीर चौघुले, रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, अरुण कदम, प्रियदर्शनी इंदलकर, सचिन गोस्वामी, सचिन मोटे, ओंकार राऊत हे हास्यजत्रेचे कलाकार दिसत आहेत. यावेळी शोच्या टीमने प्राजक्ताला वाढदिवसाची भेट म्हणून फोटोफ्रेम गिफ्ट केली आहे. ही फोटोफ्रेम प्राजक्ताने कर्जतच्या फार्महाऊसवर लावणार असल्याचं सांगितलं आहे.