अमेरिकेला जाऊन येतो!! ‘नियम व अटी लागू’ नाटकाची परदेश वारी सुरु; संकर्षणने मागितला प्रेक्षकांचा आशीर्वाद


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा त्याच्या अभिनयाइतकाच उत्तम लेखनासाठी ओळखला जातो. मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी कलाकार अशी संकर्षण कऱ्हाडेची खास ओळख आहे. तो एक उत्तम अभिनेता, लेखक, कवी, सूत्रसंचालक आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्गदेखील तितका मोठा आहे. त्याच्या अभिनयाचे, लिखाणाचे, दिग्दर्शनाचे, कवितांचे आणि त्याच्या सूत्रसंचालनाचे अनेक चाहते आहेत. केवळ भारतात नव्हे तर भारताबाहेरही हे चाहते पसरलेले आहेत. दरम्यान संकर्षण नुकताच त्याच नाटक घेऊन परदेश दौऱ्यावर गेला आहे. ज्याबाबत त्याने पोस्ट शेअर केली आहे.

गौरी थिएटर निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘नियम व अटी लागू’ या नाटकाची सध्या जोरदार हवा आहे. याच नाटकाच्या निमित्ताने अभियन्ता संकर्षण कऱ्हाडे आणि नाटकाची संपूर्ण टीम सध्या परदेश दौऱ्यावर गेली आहे. यानिमित्त संकर्षणने आवर्जून त्याच्या चाहत्यांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने परदेश दौऱ्यावर जातानाचा फोटो शेअर केला आहे. सोबतच कॅप्शनच्या माध्यमातून त्याने या दौऱ्याची माहिती देत चाहत्यांकडे आशीर्वाद मागितला आहे.

संकर्षणने या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘अमेरिकेला जाऊन येतो… १४ प्रयोगांची मोठ्ठी वारी आहे… भारतातल्या प्रेक्षकांनो शुभेच्छा, आशीर्वाद असु द्या… अमेरिकेतल्या मराठी रसिक प्रेक्षकांनो.. ”नियम व अटी लागू….” नाटकाला या….. भेटूच..’. यानुसार अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि नाटकाची टीम आता पुढील काही दिवस अमेरिकत असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या नाटकाचे प्रयोग नसतील. ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे लेखन संकर्षण कऱ्हाडेने केले असून दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे. शिवाय नाटकात संकर्षण कऱ्हाडे मुख्य भूमिकेत आणि त्यासोबत अमृता देशमुख, प्रसाद बर्वे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.