हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली आहे. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता ऋषिकेश शेलार हे कलाकार मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागले आहेत. शिवानी ‘अक्षरा’ची तर ऋषिकेश ‘अधिपती’ची भूमिका साकारतो आहे. अल्पावधीतच या पात्रांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. आता हि जोडी त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात करत आहेत. नुकताच मालिकेत अधिपती आणि अक्षरा यांचा साखरपुडा पार पडला आहे. या सुंदर क्षणाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मालिकेच्या येत्या भागात अधिपती आणि अक्षरा या दोघांचा साखरपुडा संपन्न होणार आहे. ४ सप्टेंबर २०२३ पासून साखरपुडा सप्ताह सुरु झाला आहे. दरम्यान या विशेष सोहळ्यात अनेक ट्विस्ट दाखवण्यात आले. जसे कि अक्षराच्या साडीचा गोंधळ, कमलने साखरपुड्यात येऊन घातलेला धिंगाणा यानंतर अखेर आता हा सोहळा पार पडताना दाखवणार आहेत. दरम्यान या सोहळ्याचे काही फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अधिपती आणि अक्षरा यांचा लूक फारच लक्षवेधी आहे.
अक्षराने लाल काठाची पांढरी साडी नेसली असून त्यावर लाल रंगाच्या बांगड्या, लांब हार, नथ, कमरपट्टा असा लूक केला आहे. तर अधिपतीनेही अक्षराला मॅचिंग शेरवानी परिधान केली आहे. मुख्य म्हणजे अक्षरा आणि अधिपतीच्या साखरपुड्याचं एक खास आणि अत्यंत रोमँटिक असं गाणं तयार करण्यात आलं आहे.
जे सोशल मीडियावर भारी व्हायरल होत आहे. तसेच येत्या भागात आता अक्षरा आणि अधिपतीचा साखरपुडा दाखवला जाईल. त्यानंतर महिन्याभरात त्यांचा धुमधडाक्यात विवाह सोहळा रंगणार आहे.