‘तीन अडकून सीताराम’चा गुंता सुटणार का..?; लेखक ऋषिकेश जोशी म्हणाले, ‘काही रहस्य..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत वेगळ्या शीर्षकाचा ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट सध्या फारच चर्चेत आहे. येत्या २९ सप्टेंबर २०२३ रोजी हा चित्रपट रिलीज होऊ घातला आहे. अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर रिलीज झाला आहे. दरम्यान या चित्रपटाचा जबरदस्त टिझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा टिझर बघून चित्रपटाविषयीची उत्कंठा आणखीनच शिगेला पोहोचली आहे. हा टिझर अतिशय धमाल असून यात काहीतरी गुंतागुंत दिसत आहे.

पण नेमका हा चित्रपट कोणत्या विषयावर भाष्य करतोय हे काही समजेना. त्यामुळे हा सुरू असलेला गोंधळ नक्की काय आहे..? कशामुळे आहे..? याचे उत्तर हवे असेल तर २९ सष्टेंबरला चित्रपटगृहात जायला लागणार आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेते हृषिकेश जोशी यांनी केले आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत.

‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाबद्दल लेखक, दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांनी सांगितले कि, ‘नावावरून प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, नेमका हा चित्रपट आहे तरी काय? तर टिझरवरून प्रेक्षकांना अंदाज आला असेलच. यात काही रहस्य आहेत, गुंतागुंत आहे आणि हा गुंता अखेर सुटणार का? हे यात पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे. ‘तीन अडकून सीताराम’चा खरा अर्थ प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच कळेल’.