‘मामा झाल्यासारखं वाटतंय..’; ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अभिनेत्याचा क्युट व्हिडीओ व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईक हि अप्पी हे मुख्य पात्र साकारत आहे. तर अप्पीचा नवरा अर्जुन हे अन्य मुख्य पात्र अभिनेता रोहित परशुराम साकारतो आहे. या जोडीला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. दरम्यान अभिनेता रोहित परशुरामने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये त्याचं प्राणीप्रेमी दिसून आलं आहे.

अभिनेता रोहित परशुरामने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शूटिंग सेटवर भेट झालेल्या राणी (श्वान) नावाच्या कुत्रीसोबतच जुळलेल्या गोड नात्याबद्दल सांगितले आहे. या व्हिडिओत रोहितने राणीसोबत तिच्या पिल्लांची देखील ओळख करून दिली आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘अप्पी आमची कलेक्टर_ ह्या एका नावाने खूप काही दिलं आहे, घेतलं आहे!!! भोर सोडून १० वर्षं झाली पण पुन्हा एकदा भोरची आठवण करून देणारं हे आसगाव मला माझं घर वाटतं, गावातलं एकही घर नाही जिथे मी चहा पिला नाही!!!

पुढे लिहिलंय, ‘आज राणीला ५ पिल्लं झलियेत तर आम्हाला सगळ्यांना खरंच मामा झाल्यासारखं वाटतंय!!’ रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील राणी, तिची पिल्लं आणि रोहितचं तसेच शूटिंग सेटवर असणाऱ्या इतरांचे एक वेगळेच नाते तयार झाले आहे. हा व्हिडीओ पाहून दया आणि प्रेम या भावना आजही प्रबळ आहेत असे दिसून येत आहे. तसेच या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.