किरण मानेंना ‘जवान’ बघायचाय पण.. मुहूर्त सापडेना; पोस्ट झाली व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रदर्शनापासूनच बॉक्स ऑफीसवर चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. फक्त २ दिवसात ‘जवान’ने चांगलाच रेकॉर्डब्रेक कमाईचा आकडा गाठला आहे. हा चित्रपट पाहायचा म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते. ज्यांमध्ये मराठी अभिनेते किरण माने यांचाही समावेश आहे. पण आता आपल्याला चित्रपट पहायला मुहूर्त सापडत नाही.. असे किरण माने म्हणत आहे.

याबाबत अभिनेता किरण माने यांनी अधिकृत सोशल मिडीया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरण माने यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. अद्याप या प्रोजेक्टचे नाव समोर आलेले नाही. मात्र या चित्रपटात अभिनेता किरण माने हे महत्वाची भूमिका साकारणार आहेत हे यावरून स्पष्ट होत आहे. या पोस्टमध्ये किरण माने यांनी स्वतःचा आगामी प्रोजेक्टच्या शूटिंग क्लॅपसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाल्याचे समजत आहे.

शिवाय या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘नागपूर! विदर्भात कोकण उभं केलंय… नवी भुमिका, नवी ऊर्जा. नवनविन प्रोजेक्टस् चे मुहूर्तावर मुहूर्त चाललेत याचा आनंद आहे… पण ”जवान” बघायला मुहूर्त सापडेना याची हूरहूर आहे’. याआधी किरण माने यांनी शाहरुख खान आणि त्याचा चित्रपट ‘जवान’साठी एक खास पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने आवर्जून हा चित्रपट पहायचा आहे असे म्हटले होते. रिपोर्टनुसार, ‘जवान’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ७५ कोटींची कमाई करत सुपरहिट ओपनिंग केली आहे. आता पुढे या सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे.