‘वडील वारले कि केस कापतात..’; ‘त्या’ प्रश्नावर गश्मीरने दिलेलं उत्तर चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता गश्मिर महाजनीचे कुटुंब अत्यंत भावनिक परिस्थितीचा सामना करत आहे. गश्मिरचे बाबा आणि मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय देखणे अभिनेता रवींद्र महाजनी यांचे ११ जुलै २०२३ रोजी निधन झाले. बराच काळ एकटे राहत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती महाजनी कुटुंबालादेखील नव्हती. हि बाब समोर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि मग एकीकडे वडिलांच्या निधनाचे दुःख तर दुसरीकडे ठिकाणच्या वर्षावाला गश्मीर सामोरं गेला.

या घटनेला जवळपास दोन महिने होऊन गेले. पण तरीही अद्याप लोक गश्मीरला ट्रोल करताना दिसत आहेत. या धक्क्यातून महाजनी कुटुंब बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे पण लोक टीकांचा मारा करून त्यांच्या आयुष्यातील अडचणी वाढवत आहेत. दरम्यान गश्मीर मात्र स्वतःला सावरत त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करताना दिसतोय. त्यामुळे तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय होताना दिसतोय. नुकतंच त्याने चाहत्यांसोबत अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन केले. या सेशनद्वारे त्याने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान एका नेटकऱ्याने त्याला विचारलेल्या प्रश्नाची आणि त्याच्यावर गश्मीरने दिलेल्या सडेतोड उत्तराची सोशल मीडियावर चर्चा आहे.

https://www.instagram.com/reel/CwqRnU4NCdZ/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

एका नेटकऱ्याने अभिनेता गश्मिर महाजनीला ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनदरम्यान असा सवाल केला की, ‘वडील वारले की केस कापतात यावर काय बोलाल..? मला तुमचा दृष्टीकोन ऐकायला आवडेल..’. या प्रश्नाचे उत्तर देताना गश्मिरने म्हटले कि, ‘मी जे कार्य करतो त्यावर माझ्या कुटुंबाचं अर्थार्जन होतं. टक्कल केलं असतं तर हातातून कामं गेली असती. जे माझ्यावर अवलंबून आहेत त्यांची जबाबदारी तुम्ही घेतली असती का..?’ गश्मीरने दिलेल्या उत्तराचं सोशल मीडियावर समर्थन केलं जात असून त्याचे चाहते घडून गेलेल्या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी अभिनेत्याला मदत करताना दिसत आहेत. अलीकडेच गश्मीरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत आपण पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले आहे.