‘माझ्या अत्यंत जवळच्या..’; बायको मितालीच्या वाढदिवशी सिद्धार्थ चांदेकरची रोमँटिक पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत क्युट आणि कायम चर्चेत राहणारी जोडी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर हे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. छोट्या मोठ्या कारणांमुळे दोघेही कमयम चर्चेचा विषय ठरतात. दरम्यान आज मिताली मयेकरचा २७ वा वाढदिवस आहे. यानिमित्त तिचे चाहते, नेटकरी आणि कला विश्वातील अनेक मंडळी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मग मितालीचा पती सिद्धार्थ कसा काय मागे राहील..?

बायको मितालीच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थ चांदेकरने अधिकृत सोशल मीडियावर एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने मितालीसोबतचा अतिशय क्युट आणि रोमँटिक असा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्यांच्या पॅरिस टूरमधील आहे. या फोटोसोबत सिद्धार्थने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘Happy Birthday बाळा!!! तुझ्या गोड स्वभावामुळे मला नेहमीच तुझा अभिमान वाटतो. माझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… लव्ह यू…कायम’.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी मितालीला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मितालीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सध्या सिद्धार्थ तिला घेऊन दुबईला गेला आहे. त्यामूळे दोघेही सोशल मीडियावर दुबईतील फोटो शेअर करताना दिसत आहेत. सिद्धार्थ आणि मिताली यांनी २०२१ मध्ये लग्न केलं. त्यानंतर अनेकवेळा रोमँटिक आणि बोल्ड फोटोंमुळे सिद्धार्थ- मिताली चर्चेत राहिले आहेत.