राहुल देशपांडेंनी खरेदी केली आलिशान मर्सिडीज कार; सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल गळ्याचे लाखो चाहते आहेत. प्रत्येक वयोगटात त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. राहुल देशपांडे यांची अनेक गाणी लोकप्रिय आहेत. गायक राहुल देशपांडे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात आणि आज त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. राहुल देशपांडे यांनी एक खास व्हिडीओ शेअर करत आपल्या घरी आलेल्या नव्या सदस्याची माहिती दिली आहे.

गायक राहुल देशपांडे यांच्या घरी आलेला नवीन सदस्य म्हणजेच त्यांची नवी कोरी आलिशान गाडी. राहुल देशपांडे यांनी नुकतीच नवी कोरी मर्सिडीज खरेदी केली आहे. दरम्यान ही गाडी ताब्यात घेताना त्यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आई-बापू, तुम्ही आतापर्यंत कायम माझ्या पाठीशी उभे राहिला आहात. आज मी जो काही आहे तो तुमच्यामुळे आहे. माझ्या डोळ्यासमोर सगळ्या जुन्या आठवणी आल्या’.

‘बापू मला त्यांच्या स्कूटरवर गाण्याच्या क्लासला घेऊन जायचे. आपण चौघेजणं त्या स्कूटररून फिरायला जायचो. आई-बापू, माझ्यावर चांगले संस्कार केल्याबद्दल आणि मला मोठ्यांचा आदर करायला शिकवल्याबद्दल धन्यवाद. आज मला, नेहाला आणि रेणुकाला तुम्हाला तुमच्या ड्रीम कारमध्ये बसलेलं पाहून खूप अभिमान वाटत आहे’. राहुल देशपांडे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये ते त्यांच्या कुटुंबीयांबरोबर शोरूममध्ये जाऊन गाडीचा ताबा घेताना दिसत आहेत. यावेळी त्यांची मुलगी रेणुकाने गाडीची पूजा केली. तर वडिलांना गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसवलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.