हेमांगी कवी ‘जवान’वर फिदा; थिएटरमध्ये रोमँटिक ‘चलेया’ गाण्यावर थिरकली अभिनेत्री


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिने इंडस्ट्रीचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान सध्या ‘जवान’ या सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’नंतर शाहरुखचा ‘जवान’ बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालतोय. सर्व वयोगटातील प्रेक्षक हा सिनेमा पहायला गर्दी करत आहेत. दरम्यान मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीसुद्धा ‘जवान’ पहायला थिएटरमध्ये गेली होती. हेमांगी शाहरुखची मोठी चाहती आहे. त्यामुळे ‘जवान’मधील ‘चलेया’ हे रोमँटिक गाणे सुरु होताच हेमांगी थिएटरमध्ये नाचू लागली. तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. त्यामुळे वेगवेगळे लूक, व्हिडीओ ती कायम सोशल मीडियावर शेअर करते. यावेळी हेमांगी शाहरुखचा ‘जवान’ सिनेमा पहायला गेली असतानाचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘चलेया’ गाणे सुरु आहे आणि या गाण्यावर हेमांगी कवी थिएटरमध्ये थिरकताना दिसते आहे. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत हेमांगीने ‘चलेया’ गाण्याच्या स्टेप्स फॉलो केल्या आहेत. ‘मी स्वतःला रोखू शकले नाही’, असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ स्टोरीवर शेअर केला आहे. एकुणच हा व्हिडीओ पाहून हेमांगी कवी ‘जवान’वर सॉलिड फिदा झाल्याचे दिसत आहे. ‘जवान’मध्ये मराठी अभिनेत्री गिरीजा ओकने शाहरुखसोबत काम केलं आहे आणि तिच्या भूमिकेचे हेमांगीने कौतुक केले आहे. हेमांगीने सिनेमातला गिरीजाचा एक फोटो शेअर करुन ‘Wohooo’, असं कॅप्शन दिलं आहे.