रिंकू राजगुरूने डिलीट केल्या सगळ्या Insta पोस्ट; नेमकं झालं तरी काय..?


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रिंकू राजगुरू हि मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. सैराट चित्रपटातून आर्ची म्हणून प्रकाशझोतात आलेली रिंकू आज चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. रिंकूने विविध धाटणीचे चित्रपट तसेच वेब सिरीजमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. शिवाय रिंकू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. पण काहीच वेळापूर्वी तिने इंस्टाग्रामवरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. तिने असं करण्यामागे नेमकं कारण काय..?

अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तशी ती विविध फोटो, लूक, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्ट्समूळे कायम चर्चेत असते. पण आज ती इंस्टाग्रामवरील एका कृतीमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर आपल्या आयुष्यातील लहानमोठ्या गोष्टी शेअर करणाऱ्या रिंकूने काही वेळेपूर्वीच अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवरील २ पोस्ट सोडून बाकी सगळ्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. तिने असं का केलं असेल..? ती बरी आहे का..? रिंकू काही चिंतेत असेल का..? असे प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत.

असं अचानक काय झालं असेल..? ज्यामुळे रिंकूने सगळ्या इन्स्टा पोस्ट डिलीट केल्या.. या प्रश्नाचं उत्तर तर स्वतः अभिनेत्रीच देऊ शकते. ७ लाखाहून अधिक फॉलोवर्स असतानाही तिने पोस्ट दिलीत का केले..? याबाबत मोठी चर्चा सुरु आहे. तर काहींनी असेही म्हटले आहे कि, हा प्रमोशनचा भाग असेल किंवा एखादी स्टंटबाजी आहे. याशिवाय काहींनी असाही तर्क लावला आहे कि, रिंकूचं अकाउंट हॅक झालं आहे. तिने स्टोरीदेखील हाईड केल्या आहेत. पण याबाबत अजूनही रिंकूने काही भाष्य केलेलं नाही.