‘मनापासून मारलेली हाक देवापर्यंत…’; रुपालीला आला अंबाबाईच्या कृपेचा दैवी अनुभव


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतून ‘संजना’ हे पात्र साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ‘संजना’च्या भूमिकेने रूपालीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. स्टार प्रवाहच्या गणेशोत्सव 2023 या कार्यक्रमामध्ये रुपालीला कोल्हापूरच्या आंबाबाईचे रूप घेऊन नृत्य सादर करायची संधी मिळाली. यानिमित्त रुपालीने टीमचे आभार मानताना एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आदिशक्तीच्या आशीर्वादाचा अनुभव आल्याचे म्हटले आहे.

अभिनेत्री रुपाली भोसलेने नुकतीच अधिकृत सोशल मिडीया हॅण्डलवर हि पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने आदिशक्तीच्या पेहरावातील स्वतःचे सुंदर पोजमधील फोटो पोस्ट केले आहेत. सोबतच तिने लिहिलंय, ‘कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो. माझा जन्म मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी झाला. आई मला बोलली बाकी उपास केले नहीं तरी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करायचे पण मी जमेल तसे बाक़ीचे उपास तर करतेच पण हे गुरुवार सुधा करते. जन्म झाला तेव्हा आई बाबा ना लक्ष्मी आली घरात अस वटल असेल का हा प्रश्न मला क़ायम पढ़ायचा.. पण वाटल असेल कारण आई बाबा नी क़ायम लक्ष्मी सारखच वागवल आणि आई चा आशीर्वाद सुधा क़ायम पाठिशी आहे आणि असेल.’

पुढे लिहिलंय, ‘स्टार प्रवाहच्या एका कार्यक्रमासाठी कोल्हापुरला गेले होते पण महालक्ष्मीच दर्शन घेता आलं नाही. मनाला खुप त्रास झाला. आज सुधा होतो. पण शेवटी ती आईच ना तिला माझ्या मनातली भावना समजली आणि जणू तीच भेटायला आली. हया वर्षीच्या स्टार प्रवाह गणेशउत्सवच्या तालीम करायला गेले आणि मला सांगितले की मी कोल्हापुरची महालक्ष्मी आहे आणि मी लगेच माझ्या आईला आणि मम्माला कॉल केला आणि सांगीतलं… हा योगायोग आहे की काय पण हे सगळं त्या आईनेच केल अस मला वाटत.. इच्छा शक्ति आणि मनापासून मारलेली हाक देवा पर्यंत पोहचते हे खरच आहे. स्टार प्रवाहचे खरच आभार’.