‘आपलं भांडण हे By Default..’; अक्षय केळकरची धोंगडेसाठी स्पेशल पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर हा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. सध्या तो ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. दरम्यान बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात अक्षयसोबत अभिनेत्री अमृता धोंगडेदेखील सहभागी झाली होती. तिनेही उत्तम खेळीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. बिगबॉसमध्ये अक्षय आणि अमृता कायम भांडताना दिसले. पण आता अक्षयने सोशल मीडियावर अमृता ढोंगडेसाठी केलेली पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे.

अभिनेत्री अमृता धोंगडेने नुकतीच ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी अमृता आणि अक्षयने चक्क एकत्र डान्स केला. या दोघांच्या डान्सचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेयर करत अक्षय केळकरने अमृतासाठी एक खास पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय की, ‘धोंगडेसाठी कौतुकाची पोस्ट! Bigg Boss houseमध्ये पहिल्या दिवशी प्रत्येकाच्या हाताला एक band बांधून आत पाठवलेलं. त्यात घरातल्या कामाचं division होतं. घरात आल्या नंतर थोड्या वेळाने माझ्या हातावरचा तो band पडला. आणि तू तो उचलून लपवलास. पुढे बराच वेळ तो शोधण्यात घालवावा लागला…!!!!

तर, असं आल्या आल्या पहिल्याच दिवसापासून तू जो काही मला त्रास देते आहेस… तो आज पर्यंत continue झालेला आहे! एकतर तू B टीम मधली! त्यामुळे आपण भांडणं हे by default होणारच होतं! पण task पलीकडे, B टीम च्या काही जणांसोबत घरात असल्यापासूनच माझी चांगली मैत्री झाली, आणि त्यात तू एक आहेस याचा मला आनंद आहे!’

‘पण आजची ही post खास Ticket to Finale task साठी आहे! त्या taskमध्ये अपूर्वा माझी प्रतिस्पर्धी होती आणि मला घरातील सदस्यांपैकी female partner माझ्यासाठी खेळायला निवडायचा होता. त्यावेळी घरात तू आणि राखी दोघीच होतात. राखीला stiches होते, त्यामुळे तिने खेळणं impossible होतं आणि… It was your shark week! पण, तुला विचारणं क्रमप्राप्तच होतं कारण तो taskचा भाग होता आणि तुला त्रास होतोय paining होतंय हे माहीत होत! But here comes the Dhakkad Girl! तू लगेच हो म्हणालीस यार…. आणि त्या अवस्थेतही तू जे जीव तोडून खेळलीस माझ्यासाठी… माझ्यासाठी आपण तिथे जिंकलो होतो. Thank you so much dhongdeeeeee!!!!! आणि, thank you so much for being my amazing dance partner this season! बाकी मी शिकवलं तशीच नाचलीस! धन्यवाद! कळावे! लोभ असावा!’ अक्षयची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.