प्रसाद- अमृताचं दुसरं केळवण!! ‘रंग माझा वेगळा’ टीमसोबत केली धमाल; अभिनेत्रीच्या हटके उखाण्याने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा चौथा सीजन अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या सिजनमधून अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांची जोडी प्रसिद्धीझोतात आली. ‘बिग बॉस’च्या घरात यांचे सूर जुळले पण घरातून बाहेर पडल्यानंतर मात्र ही जोडी खऱ्या अर्थाने एकत्र आली.

गेल्या २२ जुलै २०२३ रोजी अमृता आणि प्रसाद यांनी गुपचूप पद्धतीने साखरपुडा उरकला. यांनतर त्यांच्या लग्नाच्या तारखेची घोषणा करत त्यांनी हि आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. नोव्हेंबरमध्ये त्यांच्या लग्नाचा बार उडणार आहे. पण त्यापूर्वी हे जोडपं केळवणाचा आस्वाद घेत आहे.

प्रसाद- अमृताचं पहिलं केळवण तिच्या आजोबांनी थाटामाटात साजरं केलं. यानंतर आता प्रसाद- अमृताचं दुसरं केळवण ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने मोठ्या उत्साहात आणि जंगी स्वरूपात साजरं केलं आहे. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने प्रसाद- अमृताचं केळवण एका रेस्टॉरंटमध्ये साजरं केलं. प्रसाद आणि अमृताच्या केळवणासाठी त्यांनी रेड वेलव्हेट केक आणला होता. या केळवणाचा खास व्हिडीओ अमृताने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केलाय. यावेळी संजय जाधव, हर्षदा खानविलकर, रेश्मा शिंदे, अनघा अतुल, आशुतोष गोखले हे कलाकार उपस्थित होते.

अमृताने हा व्हिडीओ शेअर करताना सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं होत कि, ‘उखाणा क्रमांक २! खूपच सुंदर केळवण…धन्यवाद’. या सुंदर केळवणाच्या कार्यक्रमादरम्यान अमृताने अतिशय सुंदर उखाणा घेतला. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमृताने उखाणा घेताना म्हटले कि, ‘गुंफू मोत्यांच्या माळा तुझ्या गळा माझ्या गळा… प्रसादचं नाव घेते विथ टीम रंग माझा वेगळा’. प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख हे येत्या १८ नोव्हेंबर २०२३ रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत.