‘मला नाचता येत नसतानाबी…’; छोट्या चिंधीच्या हट्टासाठी अभिनेत्याचा ‘चलेया’ गाण्यावर डान्स


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनापासूनच बॉक्स ऑफिसवर चांगलाच जोर धरला आहे. एकीकडे ‘जवान’ चित्रपट चांगली कमाई करताना दिसतोय. तर दुसरीकडे चित्रपटातील गाणी प्रेक्षकांवर जादू करत आहेत. या गाण्यांची जादू इतकी चालतेय कि नेटकरी रिल्स बनवून शेअर करत आहेत. शाहरुख खानचा जबरा फॅन अभिनेता किरण माने यांनी देखील ‘जवान’मधील ‘चलेया’ गाण्यावर लाडक्या चिंधीसोबत व्हिडीओ बनवला आहे.

‘जवान’ प्रदर्शित होण्याआधी आणि झाल्यानंतर किरण माने यांनी आवर्जून पोस्ट शेअर करत लाडक्या शाहरुखचे कौतुक केले. यानंतर आता त्यांनी ‘जवान’ चित्रपटातील ‘चलेया’ या रोमँटिक गाण्यावर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, किरण माने आणि त्यांच्यासोबत ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतील चिंधी म्हणजे बालकलाकार अनन्या टेकवडे दिसत आहेत. किरण माने आणि अनन्या दोघेही ‘चलेया’ गाण्याच्या स्टेप्स फॉलो करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना किरण माने यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘लाडक्या लेकीचा हट्ट पुरवावा लागला. मला नाचता येत नसतानाबी नाचायला लागलं’.

किरण माने आणि अनन्या टेकवडे यांचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. किरण माने आणि अनन्या एकाच सेटवर बाप लेकीच्या भूमिकेत दिसत आहेत. जितकं ऑनस्क्रीन त्यांचं बॉण्ड प्रेक्षकांना आवडत आहे तितकाच ऑफस्क्रीन देखील त्यांचं बॉण्ड स्ट्रॉंग आहे. ऑनस्क्रीन लेकीसोबतचा हा डान्स व्हिडीओ किरण मानेंनी शेअर केल्यानंतर आता खऱ्या लेकीसोबत देखील या गाण्यावर रील बनवा असे नेटकरी सांगताना दिसत आहेत.