ये रातें, ये मौसम… स्वप्नील जोशी आणि दीप्ती देवीचा लंडन ब्रीजवर रोमान्स; Video व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वप्नील जोशी हा मराठी कला विश्वातील प्रचंड लोकप्रिय अभिनेता आहे. छोट्या पडद्यावर सुरुवात करून स्वप्नीलने मनोरंजन विश्वात स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे अभिनेता स्वप्नील जोशी आज मनोरंजन सृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. ‘आओ ना फिर..’ म्हणतं स्वप्नीलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. स्वप्नील जोशी आजही अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. अशातच त्याचा एका अभिनेत्रीबरोबर लंडन ब्रीजवरील रोमान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अभिनेता स्वप्नील जोशी त्याचा आगामी चित्रपट ‘इंद्रधनुष्य’च्या चित्रीकरणासाठी परदेशी लंडनला गेला होता. या चित्रपटात स्वप्नीलसोबत एक दोन नव्हे तर सात एकूण अभिनेत्री पहायला मिळणार आहेत. या सात अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री दीप्ती देवीसोबत स्वप्नीलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वप्नील आणि दीप्ती देवी यांचा लंडनच्या ब्रीजवरील रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ स्वतः दीप्तीने शेअर केला आहे.

या व्हिडिओसोबत दिप्तीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘जहां दोस्तों ने मिलकर लाई है ये बहार… स्वप्नील तुझ्याबरोबर शूटिंग करताना अजिबात भीती वाटत नाही आणि खूप कम्फर्टेबल असतं’. माहितीनुसार, स्वप्नील जोशीचा आगामी चित्रपट ‘इंद्रधनुष्य’मध्ये अभिनेत्री दिप्ती देवी व्यतिरिक्त प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील, सागर कारंडे अशी तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.