‘काम मिळत नाही म्हणून उघडी..; प्रार्थनाच्या नव्या व्हिडीओवर ट्रोलर्सचा निशाणा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहरे हि सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती नेहमीच विविध लूकमधील फोटो, व्हिडीओ, आगामी प्रोजेक्ट्सची माहिती तसेच आयुष्यातील लहान मोठ्या महत्वाच्या घडामोडींची माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करते. यामुळे ती अगदी सहज आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचे चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर मोठ्या संख्येने लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. यामध्ये साहजिकच चाहत्यांइतकाच ट्रोलर्सचादेखील समावेश असतो. आताही तिच्या नव्या व्हिडिओवर ट्रोलर्सने निशाणा साधला आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहरेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये प्रार्थनाने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट आणि बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. शिवाय या व्हिडिओत ती पावसात ओलीचिंब होईपर्यंत भिजताना दिसते आहे. तिचे इशारे आणि अदा पाहून भले भले गारठले असतील. पण ट्रोलर्स मात्र हा व्हिडीओ पाहून संतापले आहेत. त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये प्रार्थनाला ट्रोल करताना विविध प्रतिक्रिया देत तिला संस्कृतीचा डोस दिला आहे.

एका नेटकऱ्याने या व्हिडिओवर कमेंट करत म्हटले आहे कि, ‘ही मॅडम मराठी संस्कृतीच विसरली आहे.. कधीच चांगल्या वेशभूषेत बघायला मिळणारच नाही’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘प्रार्थनाला काय झालंय..? काम मिळत नाही म्हणून एव्हडी डेस्परेट झालीये कि उघडी व्हायला तयार आहे.. आता काय लहान नाही राहिली ही.. आंटी’. मात्र प्रार्थनाच्या चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत हार्ट ईमोजी, फायर ईमोजी शेअर केले आहेत. शिवाय मराठी सिनेविश्वातील काही कलाकार मंडळींनी देखजील तिच्या या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.