‘एका महिन्यात मिळालेला दुसरा पुरस्कार..’; सलील कुलकर्णींनी शेअर केली आनंदाची बातमी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी ६९’व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदाच्या पुरस्कारांमध्ये लोकप्रिय गायक, संगीतकार आणि गीतकार सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान पटकावला. याशिवाय सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणखी एक पुरस्कार मिळाल्याचे सांगत आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे.

सलील कुलकर्णी यांनी अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे कि, ‘गणपतीबाप्पा मोरया…भारतरत्न लतादीदी दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय महाविद्यालयात भावसंगीतचा अभ्यासक्रम माझ्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्याचा निर्णय मंगेशकर कुटुंबीयांनी आणि सुरेशजी वाडकर, मयुरेश पै आणि राजीवजी मिश्रा यांनी घेतला. हा मला एका महिन्यात मिळालेला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे असं मी मानतो ….मी मनापासून दीदींचं नाव जपण्याचा प्रयत्न करीन…’

सलील कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात आता ते भावसंगीताची शिकवणी घेणार आहेत. अभ्याक्रमाचा कालावधी ६ महिने इतके असणार आहे. तर प्रवेश क्षमता ५० जणांची असेल. सलील कुलकर्णी यांच्या पोस्टवर त्यांचे चाहते आणि नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सलील कुलकर्णी यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ते सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मध्ये परीक्षक म्हणून काम करत आहेत.