अमेयने गणपतीच्या देखाव्यातून पूर्ण केली आई- बाबांची इच्छा; घरीचं घडवलं केदारनाथाचं दर्शन


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणपती बाप्पा हा सगळ्यांचा लाडका आहे. अनेकांचे आराध्य आहे. त्यामुळे गणेशोत्सव आला कि सगळेच आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने बाप्पाचे कोडकौतुक करताना दिसतात. या सणादरम्यान अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान होतो. सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. सेलिब्रिटींनी आपल्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर केले आहेत. यांपैकी अमेय वाघच्या घरातील बाप्पासाठी केलेल्या डेकोरेशनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी मंडळींनी सोशल मीडियावर बाप्पाचे आणि बाप्पासाठी केलेल्या सजावटीचे फोटो शेअर केले आहेत. पण अभिनेता अमेय वाघने मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून घरगुती गणपती बाप्पाचे फोटो शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यंदा अमेयने घरगुती बाप्पासाठी आरास तयार करताना आई वडिलांच्या भावनांना समोर ठेवले आहे. आपल्या आई- वडिलांना केदारनाथला जाता आलं नाही म्हणून अमेयने घरातच गणपती बाप्पासाठी सजावट करताना केदारनाथ मंदिराचा सुंदर असा देखावा तयार केला आहे.

अभिनेता अमेय वाघ याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने त्याच्या घरी गणपती बाप्पासाठी बनवलेल्या केदारनाथ मंदिराच्या देखाव्याची झलक चाहत्यांना दाखवली आहे. हा खास व्हिडीओ शेअर करताना अमेयने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘माझ्या आई बाबांना काही कारणामुळे ”केदारनाथ”ला जाता आलं नाही, म्हणून आमच्या महेश काकांनी तोच देखावा घरी तयार केला!! आता गणपती थाटामाटात बसले आहेत! गणपती बाप्पा मोरया!!’ अमेयच्या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत देखावा आवडल्याचे म्हटले आहे.