हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात अगदी जल्लोषात आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाला मोदकाचा नैवेद्य हा हमखास दाखवला जातो. त्यामुळे जो तो बाप्पाचं कोडकौतुक करताना वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत आहे. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यामुळे हे सेलिब्रिटी मंडळी सुद्धा बाप्पासाठी मोदक बनवताना दिसत आहे. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’फेम गायक प्रथमेश लघाटेनेसुद्धा बाप्पाच्या आवडीचे खास उकडीचे मोदक बनवले आहेत.
गणपती बाप्पाला मोदक फार प्रिय आहेत आणि त्यामुळे गणेशोत्सवात दहा दिवस बाप्पा आला कि आवर्जून उकडीचे मोदक बनवले जातात. तांदळाच्या पीठाची उकड काढून घेतली जाते आणि छान गूळ खोबऱ्याचे सारण तयार केले जाते. मोदकाचं मऊसूत पीठ मळून त्याचे छोटे छोटे गोळे तयार केले जातात. या गोळ्यांना सुबक पाकळ्या काढून आकार दिला जातो आणि गॉड सारण भरून मोदकाला वाफ काढली जाते. मोदक बनवणे प्रत्येकाला जमतेच असे नाही. त्यामुळे मोदक बनवणे एक कला मानली जाते. गायक प्रथमेश लघाटेला गायनासारखीच ही कला अवगत आहे.
प्रथमेशचा उकडीचे मोदक बनवत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भल्याभल्यांचे मोदकाचे आकार चुकतात पण प्रथमेशला अगदी सहज मोदक वळताना पाहून प्रत्येकजण अचंबित झाला आहे. लवकरच प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे प्रथमेशच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. यावर मुग्धाने हार्ट इमोजी शेअर केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी ‘मुग्धा.. तू खूप नशीबवन आहेस’, ‘मोदकाच्या हातचे ”मोदक” खायला आलं पाहिजे…’ अशा कमेंट्स केल्या आहेत.