‘पाठीचा कणा कुठं ताठ ठेवायचा आणि..’; मराठमोळ्या अभिनेत्याने केलं बॉलिवूडच्या किंग खानचं कौतुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. मालिकांमधून प्रकाशझोतात आलेले किरण माने हे सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असतात. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सिने विश्वाशी संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांवर किरण माने परखडपणे व्यक्त होताना दिसतात. सध्या ते वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत आहेत. किरण मानेंनी नुकतीच पुन्हा एकदा बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानसाठी एक पोस्ट केली आहे.

या पोस्टसोबत किरण माने यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘न झुकता पाठीचा कणा कुठं ताठ ठेवायचा आणि कुठं नम्रपणे झुकायचं, हे ज्याला कळलं… त्यानं जग जिंकलं ! परवा एका सी ग्रेड सिनेमा दिग्दर्शकाचा इंटरव्ह्यू पाहिला, ज्यात तो सांगत होता शाहरूख कधी कुणाला नमस्कार करत नाही, ‘सलाम’ करतो… आणि हा प्रसंग डोळ्यापुढे आला. आजकाल असत्य पेरून नफरत पसरवणारे सुमार दर्जाचे कलावंत मराठीतही आहेत आणि हिंदीतही. अशांनी गढुळ केलेल्या कलाक्षेत्रात शाहरूखसारखे लोक ‘प्युरीफायर’ आहेत. लब्यू SRK.”

किरण मानेंनी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानसाठी शेअर केलेली हि पोस्ट त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरण माने यांनी शाहरुखचे भरभरून कौतुक केले आहे. इतकेच नव्हे तर या पोस्टच्या माध्यमातून किरण माने यांनी त्याची एक सवय सांगितली आहे. किरण मानेंची हि पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या पोस्टवर त्यांचे चाहतेसुद्धा मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.