हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधून अनेक कलाकार प्रकाशझोतात आले. या मालिकेत गौरीची भुमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी सोशल मीडियावर फार सक्रीय असते. या मालिकेने तिला प्रसिद्धी झोतात आणले. गौरीने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खास फोटो शेअर करत आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण गोष्टीबद्दल माहिती दिली आहे. गौरीने शेअर केलेला फोटो पाहून तिने खऱ्या आयुष्यात साखरपुडा केल्याचे बोलले जात आहे.
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यातील एका फोटोत गौरीने तोंडासमोर हात घेतला आहे आणि ती बोटातील अंगठी दाखवते आहे. तर दुसऱ्या फोटोत तिने फक्त हातांचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तीच्या बोटातील अंगठी साहजिकच लक्ष वेधून घेते आहे. हि अंगठी पाहून गौरीने साखरपुडा केल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. गौरीने या फोटोंसोबत ‘its Happening’ असा हॅशटॅग वापरला आहे.
त्यामुळे गौरीने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून तिने साखरपुडा केला असल्याचे बोलले जात आहे. तिच्या या पोस्टवर नेटकरी आणि चाहते तर शुभेच्छा देऊ लागले आहेत. मुख्य म्हणजे नेटकऱ्यांच्या कमेंट्सवर गौरी फक्त स्माईली आणि हार्ट ईमोजी शेअर करते आहे. त्यामुळे नेटकऱ्यांचा अंदाज आणखीच बळावला आहे. तर काहींनी हे फोटो गौरीच्या आगामी प्रोजेक्ट्शी संबंधित काहीतरी इशारा देत आहेत असेही म्हटले आहे.