‘लहान बाळ परमेश्वराचे रूप…’; ‘आई कुठे काय करते’मधील चिमुकल्या जानकीसाठी अनिरुद्धची पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’मधील जवळपास सर्व पात्र प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत. प्रेक्षकांसाठी आता ही पात्रे रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत. मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, संजना, आशुतोष आणि अगदी छोटुशी जानकीसुद्धा या मालिकेत वेगवेगळे रंग भरत असते. तिच्या मालिकेत असण्याने सेटवर चैतन्य असते आणि हेच सांगताना अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी यांनी हि पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ”’त्विशा” म्हणजेच आमच्या “आई कुठे काय करते“ या मालिकेमधलं छोटसं पिल्लू “जानकी”. अगदीच काही महिन्याची असताना ती आमच्या सिरीयलमध्ये आली. अगदी एखाद्या घरामध्ये लहान बाळ जन्माला येतं. तसंच सगळ्यांना वाटतं .. आणि आपल्या घरामध्ये कसं लहान मुलाच्या खाण्यापिण्याच्या झोपायच्या वेळा सगळं सांभाळल्या जातात, तसंच त्विशाच्या बाबतीतही अगदी तसंच सगळं पाळलं जातं, मधेच एखादा असिस्टंट धावत यायचा कि त्विशा आता उठली आहे, आता ती छान खेळते आहे, मग बाकीचे जे शूटिंग चालू असायचं ते थांबून तिच्या सीनच शूटिंग सुरू करायचं. तिचीही सेटवरच्या सगळ्यांची ओळख झाली असल्यामुळे सगळ्यांकडे ती छान पद्धतीने रमते. महिन्यात न एखाद दोन दिवस तिथे शूटिंग असायचं आणि त्यादिवशी सेटवर एक वेगळच चैतन्य पसराचं. बहुतेक सगळेच प्रौढ, लहान मुलासारखं बोलायला लागायचे आणि ज्या सिनमध्ये ती असेल तो सिन कसा होईल हे कोणालाच ठाऊक नसायचं कारण ती ज्या पद्धतीने ते करेल तिच्या mood असेल त्या पद्धतीनेच ते शूटिंग व्हायचं’.

‘सिरीयलमध्ये माझ्या वाटेला तीचे सिन फार कमी आले आहेत, पण ज्या ज्या वेळेला ते आले त्या त्या वेळेला मला तो सीन करायला खूपच मजा आली, आपण शूटिंग करतो असं वाटायचं नाही लहान मुला बरोबर लहान मुलासारखा आपण खेळतोय असंच वाटायचं, खरंतर अनिरुद्ध देशमुख ला ह्या गोष्टींची फार गरज असते, पण काल त्विशा बरोबर माझा सीन होता आणि हल्ली ती ज्या पद्धतीने धावते पळते एका जागेवर स्वस्त बसत नाही, अख्या सेट भर ती फिरत असते, कधी कधी तिला कडेवर घेऊन बसवावं लागतं. काल अचानक तिचे “आई कुठे काय करते”मधले सुरुवातीचे दिवस आठवले आणि लक्षात आलं की एक वर्ष निघून गेलं , आणि कसं ते कोणाला कळलच नाही, परवा परवा पर्यंत रांगत होती मग चालायला शिकली आणि आता चक्क धावते…. लहान बाळ परमेश्वराचे रूप असतात असं म्हणतात ते काय खोटं नाही, तिला उदंड आयुष्य यश आरोग्य आनंद सुख समृद्धी सर्व काही मिळो हीच त्या परमेश्वराकडे प्रार्थना’..