लंडनमध्ये पिझ्झा बर्गर सोडून गौऱ्या खातोय वडापाव; म्हणाला, ‘याच्याशिवाय पोटचं भरत नाही..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कॉमिक शोमधून स्वतःचाच अपमान करवून इतरांना हसवणारा गौरव मोरे अल्पवधीतच प्रेक्षकांचा लाडका झाला आहे. या कार्यक्रमातून तो घराघरांतच नव्हे तर प्रेक्षकांच्या मनामनांत देखील पोहोचला आहे. या कार्यक्रमामुळे गौऱ्याला ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ म्हणूनदेखील ओळखले जाते. गौरव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो आणि त्यामुळे तो नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. विविध फोटो तसेच कॉमिक व्हिडीओ शेअर करत तो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतो. आताही अशाच एका व्हिडीओमुळे तो चर्चेत आला आहे.

सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील सर्व कलाकार मंडळी सुट्टीवर आहेत. जो तो आपापल्या परीने व्हॅकेशन एन्जॉय करतोय. दरम्यान अभिनेता गौरव मोरे हा लंडनला एका शूटिंगसाठी फेल आहे. इथून त्याने एक रील व्हिडिओ बनवून शेअर केला आहे. जो चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो लंडनमध्ये असूनही चक्क वडापाव खाताना दिसतोय. इतकंच नव्हे तर या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री मनिषा शिंदेसुद्धा दिसते आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला गौरव लंडनमध्ये फिरताना मनिषाला वडापाव खाताना बघतो. मग शिल्पा गौरवला हाय, हॅलो करुन ‘वडापाव खाणार का?’, असं विचारते. यावर गौरव म्हणतो, ‘तुम्ही लंडनमध्ये येऊन पण वडापाव खाणार का..? इकडंच पिझ्झा, बर्गर असं काही तरी ट्राय करा. आपण आपल्याकडे जाऊन तर हे खाणारचं ना. काय बोलणार, जाऊ दे’.

यावर मनिषा म्हणते, ‘ए मी वडापावच खाणार’. थोड्या वेळाने गौरवसुद्धा वडापाव खाताना दिसतो. यावेळी मनिषा त्याला म्हणते, ‘काय वडापाव..? पिझ्झा बर्गर काही खाता येत नाही का..?’ यावर गौरव म्हणतो, ‘जगात कुठेही जा, वडापाव खाण्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय पोट भरलंय असं वाटतच नाही’. त्यानंतर तो मनिषाला ‘वडापाव खाणार का..?’ विचारतो आणि मग दोघेही मस्त वडापाव अन कोल्हापूरी मिरची खाणे एन्जॉय करताना दिसतात. या व्हिडीओला गौरव मोरेने ‘जगात कुठे पण आपला वडापावच लयभारी’, असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘जी मजा वडापाव मध्ये आहे ती बर्गरमध्ये नाही’. तर आणखी एकाने म्हटले, ‘जहा भी जाते हो वहीं पर छाॅं जाते हो भाई साहब’.