‘हा प्रवास कधी संपला…’; ‘ढोलकीच्या तालावर’ कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अक्षय केळकरची पोस्ट व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाचा होस्ट अक्षय केळकर हा बिग बॉस मराठी सीजन ४ चा विजेता आहे. बिग बॉस नंतर अक्षयने त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच सूत्रसंचालक म्हणून ‘ढोलकीच्या तालावर’ हा शो होस्ट केला. या कार्यक्रमादरम्यान त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. पण आता हा कार्यक्रम महाअंतिम सोहळ्यासह प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ‘ढोलकीच्या तालावर’चा महाअंतिम सोहळा उत्तरार्ध येत्या 1 ऑक्टोबरला पहायला मिळणार आहे. तत्पूर्वी शो होस्ट अक्षय केळकरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अक्षय केळकरने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘शेवटी finale आलाच….!!! पुन्हा एकदा ३ महिन्यांचा प्रवास… कधी सुरू झाला कधी संपला कळलच नाही! या मंचाने खूप काही शिकवलं. आमच्या सगळ्या लावण्यवतींनी खूप जीव तोडून मेहनत केली आणि सगळ्याच शानदार होत्या! त्या सगळ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात यश मिळो आणि त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होवोत. आशिष पाटील.. क्रांती रेडकर.. अभिजित पानसे… थँक्यू सो मच!! मला सांभाळून घेण्यासाठी आणि माझ्या वेडेपणात मला साथ देण्यासाठी.. आमचे कमा….. ल कोरिओग्राफर्स ….’

‘हल्ली मला सगळे सांगतायत जरा जरा तालात नाचायला लागलायस तू, तर हे तुमच्या मुळे but, on a serious note, कार्यक्रम हिट होता आणि त्याची क्वालिटी तुम्ही सांभाळीत. Kudos🫡 तुमच नाव जगभरात होऊ दे.. माझ्या वर विश्वास ठेऊन, ही संधी दिली त्यासाठी, थँक्यू!!’ यासोबत अक्षयने सर्वांचा नावाचा यात उल्लेख केला आहे. ज्यामध्ये कोरिओग्राफर्स, ढोलकीच्या तालावरची संपूर्ण टीम, कलर्स मराठी वाहिनी, पडद्यामागील आणि पडद्यावरील सर्व कलाकारांचे त्याने आभार मानले आहेत. पुढे असंही लिहिलंय कि, ‘खूप जास्त मोठ्ठं थँक्यू प्रेक्षकांना, तुमच्यामुळे मी घडतोय! नवीन काहीतरी करु शकतो आहे. असच प्रेम करत रहा!’