‘तू नेहमी माझ्या हृदयात..’; दिवंगत बहिणीच्या आठवणीत अभिनेत्री झाली भावुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘देवो के देव महादेव’, ‘सिया के राम’, ‘देवयानी’ यांसारख्या मालिकांमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री भाग्यश्री मोठे हि कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते. भाग्यश्रीची मोठी बहीण मधू मार्केंडेयचा मार्च महिन्यात संशयास्पद मृत्यू झाला होता. यानंतर भाग्यश्रीने सोशल मीडियावर बहिणीच्या मृत्यूविषयी माहिती देत संशय व्यक्त केला होता. शिवाय अनेकदा ती बहिणीच्या आठवणीत भावनिक पोस्ट शेअर करताना दिसते.

https://www.instagram.com/p/CxqOiRPP3oS/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

नुकतीच अभिनेत्री भाग्यश्री मोटेने अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये भाग्यश्री आणि तिची मोठी बहीण मधू दिसत आहे. हा फोटोत भाग्यश्री आणि तिची बहीण मधू दोघीही फार सुंदर हसताना दिसत आहेत. त्यांचा हसरा चेहरा पाहून कुणाच्याही मनाला समाधान वाटेल. पण आज मधू यांच्या निधनानंतर भाग्यश्री मात्र एकटी पडली आहे. तिने हा फोटो शेअर करताना अत्यंत भावनिक अशी पोस्ट शेअर केली आहे. भाग्यश्रीने ही पोस्ट शेअर करण्याचे कारण म्हणजे मधू यांचा वाढदिवस. दोन दिवसांपूर्वी भाग्यश्रीच्या दिवंगत बहिणीचा वाढदिवस होता आणि त्यामुळे बहिणीच्या आठवणीत भावुक झालेल्या भाग्यश्रीने हा फोटो शेअर केला आहे.

सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘तो वेळ पुन्हा रिवाइंड करावा अशी माझी इच्छा आहे! तू मला सर्वात आनंदी ठेवायचीस. तू नेहमी माझ्या हृदयात आहे’. मधू मार्कंडेय केकचा बीजनेस करत होत्या. व्यवसाय मोठा करण्याच्या उद्देशाने त्या मैत्रिणीसोबत भाड्याने रूम बघण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर मधू चक्कर येऊन कोसळल्या. मैत्रिणीने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेले आणि तिथून महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आले. जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. याविषयी मधुच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.